लाचखोरी : १५ हजाराची लाच घेताना कोपरगावात महसूलचे दोन आधिकारी जेरबंद
आधुनिक केसरी न्यूज
किशोर पाटणी
शिर्डी : वाळु वाहतूक करणा-या वाहनांवर कारवाई टाळण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयातील लिपीक चंद्रकांत नानासाहेब चांडे वय ३९ व अव्वल कारकुन योगेश दत्तात्रय पालवे वय ४५ यांना १५ हजाराची लाच घेताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे
९ डिसेंबर रोजी हा छापा टाकण्यात आला एका खासगी तक्रारदाराने याबाबत तक्रार केली होती त्यानंतर सांपाळा लावून या दोघांना जेरबंद करण्यात आले संदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिला घार्गे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संतोष पैलकर पोलीस निरीक्षक संदीप घुगे पोलीस कर्मचारी दिनेश खैरनार गणेश निंबाळकर अविनाश पवार नितीन नेटारे याच्या पथकाने हि कारवाई केली कोपरगाव तहसीलचे अनेक कर्मचारी अनेकदा लाचलुचपत कारवाई मध्ये सापडले असताना ही वाळू तस्करांना लगाम घालण्यात महसूल विभागाला यश मिळत नसल्याचे पुढे आले आहे
Comment List