स्वतःचा रक्ताने पहिली सही करून एक लाख सह्यांच्या शुभारंभाला सुरुवात
रिसोड: - सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत द्यावी म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सभापती रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती विष्णुपंत भुतेकर यांनी आज रिसोड स्थित कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री यांना एक लाख सह्यांचे निवेदन देण्याच्या कार्याला शुभारंभ केला आहे.
यावेळी डॉ. जितेंद्र गवळी, रवींद्र चोपडे, गजानन जाधव, श्रीरंग नागरे, डॉ. अमर दहीहंडे, हरीभाऊ बाजड, पत्रकार शंकर सदार, विकास झुंगरे, सीताराम लोखडे, वैजिनाथ रंजवे, विष्णु सरकटे, रवी जाधव, विनोद मावळ, तेजराव पाटील वानखेडे, सीताराम इंगोले, भय्या देशमुख, सुनील सदार, भगवान सदार, शंकर सुरुषे, गजानन गारडे, सचिन सदार, विनोद मावळ, पांढरी नागरे, महादेव पातळे, विनोद खडसे, कैलास इंगोले, महादेव पाटील सानप, जगन सदार, मुरली पाटील गाडे, हकीम भाई, गुलाबराव प्रहाड, ऍड. अवताडे, भाऊराव पाटील गरड, भाऊंराव खंदारे यांचासह तालुक्यातील शेतकरी व भूमिपुत्रचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक लाख सह्यांचे निवेदनाचा शुभारंभ भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी आपल्या स्वतःच्या रक्ताच्या सहीने केला. यावळी उपस्थित भूमिपुत्र संघटनेचा सर्व पदाधिकाऱ्यानी रक्ताने सह्या केल्या. भूमिपुत्र कडुन एक जानेवारी पर्यंत एक लाख सह्या घेऊन सरकारला पाठवल्या जाणार आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन भावा मुळे कोसळे आहेत. सोयाबीन व कापूस उत्पदकांना मदत मिळे पर्यंत भूमिपुत्र आंदोलन सरू ठेवणार आहे.
तसेच आकांक्षीत ( मागास) असणाऱ्या वाशिम जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकरी व कापूस उत्पादक शेतकरी पडलेल्या भावामुळे देशोधडीला लागले आहेत. राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत न केल्यास भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक बजेट सोयाबीन भावामुळे कोलमडले आहे. राज्य सरकारने भावांतर योजनेच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचे मत विष्णुपंत भुतेकर यांनी यावेळी व्यक्त केले
Comment List