माता महाकालीची महा आरती करत आमदार किशोर जोरगेवार यांनी दर्शवली विविध सामाजिक उपक्रमात उपस्थिती.
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : सकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकालीची महाआरती करत आजच्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर योग नृत्य परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पक्ष आणि आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने शहरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकालीचे दर्शन घेत पूजा-अर्चना केली. त्यानंतर आझाद बाग येथे योग नृत्य परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. दिवसभर आयोजित विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना त्यांनी भेटी देत शुभेच्छुकांचे शुभेच्छा स्वीकारल्या.
आज विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार किशोर जोरगेवार यांनी या शिबिरांना भेट देऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आभार मानले. या शिबिरांमध्ये शेकडो रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यासोबतच हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. नागपूर रोडवरील दर्गा येथे आयोजित कार्यक्रमातही आमदार किशोर जोरगेवार यांनी सहभाग घेतला. त्यानंतर एमआयडीसी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी जैन गुरूंचे आशीर्वाद घेतले. वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक व धार्मिक उपक्रमांमुळे चंद्रपूर शहरात एक सामाजिक एकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या या कार्यक्रमांचे नागरिकांनीही भरभरून स्वागत केले.
Comment List