आमच्याविषयी 

आधुनिक केसरी हे आधुनिक काळातील एक निष्पक्ष आणि सर्वसमावेशक असं वर्तमानपत्र असून या वर्तमानपत्रामध्ये सर्व नवलेखकांना, नव्या वाचकांना आणि नव्या विचारवंतांना एक वेगळं व्यासपीठ मोकळपणाने उपलब्ध व्हावं यासाठी हे वर्तमानपत्र कार्य करत आहे. आधुनिक काळात समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आजची तरुण पिढी असो की कार्पोरेट सेक्टर किंवा मग आयटी सेक्टर असो या सगळ्यांमध्ये हार्ड कॉपी हातात घेऊन वृत्तपत्र वाचणे ही पद्धतच आता जवळपास बंद झालेली आहे. नेमका हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवत आधुनिक केसरी आपले हे वर्तमानपत्र वाचकांना सहज वाचता यावं, त्याचा दर्जा उत्तम राहावा या दृष्टीने प्रयत्न करत आहे.
आधुनिक केसरीचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे स्थित आहे. नवीन पिढी वृत्तपत्राच्या वाचनाकडे वळावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक केसरी आपली पुढची वाटचाल करत आहे. वाचकांचे प्रेम, सहकार्य आणि सदिच्छा सदैव सोबत राहतील एवढीच अपेक्षा.