पैठणला ऐतिहासिक तिर्थस्तंभावर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत
आधुनिक केसरी
दादासाहेब घोडके
पैठण : दक्षिण काशी तील श्रीक्षेत्र पैठण येथील सम्राट शालिवाहन नगरीत दीं.30 रविवारी हिंदू वार्षिक कालगणना शक आरंभ उत्सव साजरा करण्यात आला.
पैठण शहरातून सम्राट शालिवाहन प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येऊन जुन्या पैठण मधील प्राचीन तिर्थस्तंभ कीर्तिस्तंभ उद्यानात गुढी मान्यवरांच्या हस्ते उभारण्यात आली
यावेळी पैठण करानी अतिशय प्राचीन असलेली व केंद्र सरकारच्या
ताब्यात असलेल्या शालिवाहन नगरीची राष्ट्रीय स्थळ म्हणून केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 28 एकर जमीन त्यांच्या ताब्यातील एकमेव देशातील दुर्मिळ प्राचीन स्थळ पूर्णतः विकसित करण्यासाठी तत्काळ कारवाई करावी .सद्य स्थितीत हा परिसर पालथी नगरी म्हणून ओळखला जातो .
यावेळी शालिवाहन पतसंस्था चेअरमन किशोर चव्हाण ,माजी नगराध्यक्ष चंद्रशेखर पाटील,सूरज लोळगे ,तुषार पाटील, माजी अध्यक्ष व्यापारी महासंघ पवन लोहिया ,मा नगरसेवक जितू परदेशी, देवेश इनामदार, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी ,आदर्श रुग्णसेवकरमेश खांडेकर ,समिती अध्यक्ष सागर पाटील, शिवराज पारीक, दिनेश पारीख ,संतोष गव्हाणे, सौ अश्विनी लख्मले ,मदन आव्हाड ,ऍड राजेंद्र गोर्डे ,पो.नी. संजय देशमुख बद्रीनाथ खंडागळे आदींची भाषणे झाली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List