बारा वर्षीय मेघाला मृत्यूच्या दाढेतून काढत आयुष्याची उभारली गुढी; कुटुंब अन् गावकऱ्यांच्या डोळ्यात तरळले डॉक्टरांप्रती कृतज्ञतेचे अश्रू

निष्णात सर्पदंश तज्ज्ञ डॉ.दिलीप पुंडे यांचे प्रयत्न फळाला!

बारा वर्षीय मेघाला मृत्यूच्या दाढेतून काढत आयुष्याची उभारली गुढी; कुटुंब अन् गावकऱ्यांच्या डोळ्यात तरळले डॉक्टरांप्रती कृतज्ञतेचे अश्रू

आधुनिक केसरी

संजय कांबळे

मुखेड : रात्र २७ मार्चची वेळ दीड ते दोन वाजण्याची. कुटुंब गाढ झोपेत असताना पलंगावर झोपेत असलेल्या १२ वर्षीय मुलीला कोब्रा नामक विषारी सापाने दंश केला त्याचक्षणी मुलगी किंचाळली. तिच्या आवाजाने बाजूला झोपलेला मोठा भाऊ अन् जमीनीवर झोपलेली तिची आई खडबडून जागी झाली. पहातात तर काय मुलीच्या डाव्या हाताच्या बोटाला सापाने चावा घेतलेला त्या जखमेतून रक्त वाहू लागलेले अन् दंश केल्यानंतरही निपचीत पडलेला नाग दिसला. कुटुंबाच्या आरडाओरडीने शेजारी, गावकरी धावून आले. क्षणाचाही विलंब न करता मुलीला घेऊन डॉ.दिलीप पुंडे यांचे हाॅस्पीटले गाठले. तोपर्यंन्त मुलगी बेशुद्ध झाली. ऱ्हदयाचे ठोके देखील लागेनात अशा गंभीर स्थितीत मुलीला सीपीआर देण्यात आला. व्हेंटिलेटरवर घेत आपल्या प्रयत्नांनी पराकाष्ठा पणाला लावून या कन्येला डॉ.पुंडेनी जिवदान दिले. गुढीपाडव्याच्या दिवशी रूग्णालयातून सुट्टी देताना कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता अन् डोळ्यांतून डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञतेचे अश्रू ओघळले.
मेघा नागनाथ स्वामी वय १२ वर्षे रा. गडगा ता.नायगाव असे या मुलीचे नाव आहे. नेहमीप्रमाणे ती जेवण करून आपल्या मोठ्या भावासमवेत पलंगावर झोपली होती. आई ही जमीनीवर तर तिचे वडील मोलमजुरी कामानिमित्ताने बाहेरगावी होते. २७ मार्चची रात्र या कुटुंबासाठी संकट घेवून आली. रात्रीचे पावणेदोन वाजण्याची वेळ असावी त्यावेळी या मुलीच्या डाव्या हाताच्या बोटाला विषारी कोब्रा नामक नागाने (सापाने) दंश केला. त्याचक्षणी मुलगी जागी झाली. हाताच्या जवळच निपचीत पडलेला साप पाहून ती किंचाळली. तिच्या आवाजाने सर्वजण जागी झाले. आरडाओरड आवाजाने अनेकजण मदतीला धावून आले. क्षणाचाही विलंब न करता वायु वेगाने वाहनातून मेघाला ३० मिनीटाच्या आत मुखेडच्या निष्णात सर्पदंश चिकित्सक डॉ. दिलीप पुंडे यांच्या रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी रात्रीचे अडीच वाजलेले होते अन् मेघा बेशुद्ध पडली. ऱ्हदयाचे ठोके मंदावले अशा गंभीर स्थितीत मुलीला सीपीआर देण्यात आला. श्वसननलिकेत नळी टाकून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास थोडीशी डोळ्यांची पापणी हालली डोळे उघडले अन् हालचाल सुरू झाली. त्यामुळे डॉक्टरांचा आत्मविश्वास वाढला. चार दिवसांच्या उपचारानंतर ती पूर्णपणे ठीक झाली. ३० मार्च रोजी मेघाला गुढीपाडव्याच्या दिवशी रूग्णालयातून सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. या मुलीच्या उपचारासाठी डॉ.दिलीप पुंडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. नितीन अंबेकर, डॉ. मुकुंद गोपुलवाड यांनी यशस्वी प्रयत्न केले. रूग्णालयातील भास्कर इंगोले,शंकर चव्हाण, व्यकंट शिंदे-गडगेकर, राम जाधव, बालाजी डोनगावे, गजानन बंडे, दिनेश देव्हारे, आरिफ यांनीही मदत केली.
मुस्तफा कुरेशी मदतीला धावला.
घटनेची माहिती मेघाच्या भावाने मित्रत्वातील नागनाथ वारे, मुस्तफा कुरेशी यांना सांगितली. क्षणाचाही विलंब न करता हे दोघेही मदतीला धावून आले. मुस्तफा ने देखील ताबडतोब कार घेऊन मदतीला धावला त्यामुळे मेघाला वेळेत उपचार मिळाले.
गावकऱ्यांनी केला डाॅ.दिलीप पुंडे, डॉ.नितीन अंबेकर यांच्यासह टीमचा सऱ्हदय सत्कार डॉ. दिलीप पुंडे यांच्या अथक उपचाराने मेघा स्वामी हीला जिवदान मिळाले. या चिमुकल्या बालीकेला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याबद्दल डॉक्टर मंडळीसह त्यांच्या संपूर्ण टिमचे गडगा येथील गावकऱ्यांनी ३१ मार्च रोजी सकाळी रूग्णालयात भेट दिली अन् या वैद्यकीय सेवेतील मंडळीचा सऱ्हदय सत्कार केला. यावेळी मुलीची आई सखुबाई, वडील नागनाथ स्वामी, काका सोमनाथ स्वामी, मल्लिकार्जून स्वामी, पत्रकार वसंत पाटील जाधव, सामाजिक कार्यकर्ते नागनाथराव वारे, माधव माळगे, समुंख स्वामी, किशोर स्वामी, ह.भ.प. आनंदराव चिलपिपरे, सदाशिव शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. डॉ. दिलीप पुंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

'संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा 'संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा
आधुनिक केसरी पुणे: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जाणून बुजून एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड...
मुंबईकरांनो....तुमच्या खिशावर महापालिकेचा अजून एक डल्ला !
बारा वर्षीय मेघाला मृत्यूच्या दाढेतून काढत आयुष्याची उभारली गुढी; कुटुंब अन् गावकऱ्यांच्या डोळ्यात तरळले डॉक्टरांप्रती कृतज्ञतेचे अश्रू
काचबंद कार मध्ये पोलीस जवानांचा आढळला मृतदेह 
पैठणला ऐतिहासिक तिर्थस्तंभावर  गुढी उभारून  नववर्षाचे स्वागत
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून हिंदू नववर्षाचे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची पाहणी