काचबंद कार मध्ये पोलीस जवानांचा आढळला मृतदेह 

 घातपाताचा संशय,पोलीस व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी 

काचबंद कार मध्ये पोलीस जवानांचा आढळला मृतदेह 

आधुनिक केसरी न्यूज

देऊळगाव राजा : जालना हायवे पोलीस दलात कार्यरत पोलीस जवानाचा मृतदेह वन जंगलात काच बंद कार मध्ये आढळल्याचा प्रकार आज (ता.३०) उघडकीस आला, दरम्यान मृतक पोलीस जवानाचा घातपात झाल्या चा संशय व्यक्त होत असून संशयितरित्या कार मध्ये मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह फॉरेन्सिक एक्सपर्ट चमू घटनास्थळी दाखल झाले आहे.

याबाबत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील गिरोली खुर्द येथील ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के वय ३८ हे जालना पोलीस दलात (महामार्ग) विभागात कार्यरत आहे. मृतक ज्ञानेश्वर म्हस्के शनिवारी गुढीपाडवा सणानिमित्त मूळ गावी आले होते. शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर आर जे इंटरनॅशनल स्कूल समोरील वन विभागाच्या परिक्षेत्रात त्यांचे वाहन क्रमांक एम एच २० डी वाय ३०६३ आज सकाळी संशयित स्थितीत उभे दिसले. तर मृतक जवानाच्या पत्नी ने रात्री वारंवार फोन केला असता कॉल न घेतल्यामुळे शंका आली व त्यांनी मृतकाचे सहकारी एका पोलीस कर्मचाऱ्याला कॉल करून ते कॉल उचलत नाही म्हणून काळजी वाटत असल्याचे सांगितले. सदर पोलीस कॉन्स्टेबल यांनी अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्याशी संपर्क केला असता मृतक ज्ञानेश्वर यांची कार आर जे इंटरनॅशनल स्कूल जवळ असल्याचे लोकेशन मिळाले व सदर घटना उघडकीस आली. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम ठाणेदार संतोष महल्ले, पोलीस उपनिरीक्षक भरत चिरडे, दत्तात्रय नरवाडे, प्रशिक्षणार्थी पीएसआय कांचन जारवाल व कोमल शिंदे घटनास्थळी दाखल झाले. पोलीस जवानाचा संशयितरित्या मृतदेह आढळल्याची माहिती परिसरात पसरल्याने घटनास्थळी नातेवाईक आणि नागरिकांनी गर्दी केली होती. दहा दिवसांपूर्वी अंढेरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल गिरी यांच्या खुनाच्या प्रकरणात अवैध दारू माफियाला अटक करण्यात आली व आज संशयितरित्या पोलीस जवानाचा मृतदेह आढळले ह्या घटनेचे गांभीर्य बघता अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री महामुनी, बुलढाणा फॉरेन्सिक एक्सपर्ट चमू यांनी घटनास्थळी पाहणी केली. तदनंतर मृतदेह स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आले. वृत्तलेपर्यंत पोलिसांमार्फत अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचा खुलासा करण्यात आला नव्हता मात्र रात्रीच्या वेळी वन क्षेत्रात काच बंद वाहनात पोलीस जवानाचा मृतदेह संशयित स्थितीत आढळून आल्याने घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर पोलिसांमार्फत खून की आत्महत्या याबाबत अधिकृत खुलासा करण्यात येईल. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष महल्ले सदर प्रकरणाची चौकशी करीत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

'संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा 'संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा
आधुनिक केसरी पुणे: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जाणून बुजून एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड...
मुंबईकरांनो....तुमच्या खिशावर महापालिकेचा अजून एक डल्ला !
बारा वर्षीय मेघाला मृत्यूच्या दाढेतून काढत आयुष्याची उभारली गुढी; कुटुंब अन् गावकऱ्यांच्या डोळ्यात तरळले डॉक्टरांप्रती कृतज्ञतेचे अश्रू
काचबंद कार मध्ये पोलीस जवानांचा आढळला मृतदेह 
पैठणला ऐतिहासिक तिर्थस्तंभावर  गुढी उभारून  नववर्षाचे स्वागत
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून हिंदू नववर्षाचे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची पाहणी