दुचाकी अपघातात पोलीस कॉन्स्टेबल ठार,एक जखमी ; अवैध दारू विक्रेत्याचा पाठलाग करतानाची घटना

दुचाकी अपघातात पोलीस कॉन्स्टेबल ठार,एक जखमी ; अवैध दारू विक्रेत्याचा पाठलाग करतानाची घटना

आधुनिक केसरी

 देऊळगाव राजा : अवैध दारू विक्रेत्याच्या दुचाकीचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुजाकीला दारू विक्रेत्याने लाथ मारल्याने पोलिसांची दुचाकी झाडावर आढळून झालेल्या अपघातात आज (ता.२३) एक पोलीस कर्मचारी जागी ठार तर हेडकॉन्स्टेबल गंभीर जखमी झाल्याची घटना शेळगाव आटोळ शिवारात घडली. दरम्यान पोलिसांनी अवैध दारू माफियाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 
 याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील अवैध दारू माफिया संजय उत्तम शिवणकर हा दुचाकी वर अवैध दारूचे बॉक्स घेऊन जाताना पोलिसांना दिसले. यावेळी बीट जमादार रामेश्वर अवचितराव आंधळे आणि पोलीस कॉन्स्टेबल भागवत गणेश गिरी यांनी अवैध दारू विक्रेत्याच्या दुचाकीचा सिनेस्टाईल  पाठलाग केला. पोलीस हे आपल्या जवळ आल्याचे पाहून अवैध दारू विक्रेत्याने चालत्या दुचाकी वरून पाठलाग करणाऱ्या दुचाकीला लाथ मारल्याने पोलिसांची दुचाकी वरील ताबा सुटून दुचाकी रस्त्याच्या कडेवर  एका झाडावर आढळली. हा अपघात एवढा गंभीर होता की डोक्याला गंभीर मार लागून भागवत गिरी वय ३० या पोलीस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी बीट जमादार रामेश्वर आंधळे यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. पोलिसांनी अवैध दारू विक्रेता संजय उत्तम शिवनकर राहणार शिनगाव जहागीर यास अटक करून गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती.
* शासकीय ईतमामत होणार अंत्यसंस्कार - अवधत दारू प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी कर्तव्यावर असलेले मृतक पोलीस कॉन्स्टेबल भागवत गणेश गिरी यांच्यावर आज रात्री उशिरा त्यांचे जन्मगाव पांगरी उगले येथे शासकीय इत्तमामात अंत्यसंस्कार होणार आहे. बुलढाणा पोलिसांकडून त्यांना सलामी देण्यात येणार आहे. मृतात पोलीस कॉन्स्टेबल गिरी यांच्या पाश्चात आई-वडील पत्नी, एक मुलगा,एक मुलगी,एक भाऊ असा आप्त परिवार असून या दुर्दैवी घटनेमुळे पांगरी उगले गावावर शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

'संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा 'संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा
आधुनिक केसरी पुणे: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जाणून बुजून एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड...
मुंबईकरांनो....तुमच्या खिशावर महापालिकेचा अजून एक डल्ला !
बारा वर्षीय मेघाला मृत्यूच्या दाढेतून काढत आयुष्याची उभारली गुढी; कुटुंब अन् गावकऱ्यांच्या डोळ्यात तरळले डॉक्टरांप्रती कृतज्ञतेचे अश्रू
काचबंद कार मध्ये पोलीस जवानांचा आढळला मृतदेह 
पैठणला ऐतिहासिक तिर्थस्तंभावर  गुढी उभारून  नववर्षाचे स्वागत
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून हिंदू नववर्षाचे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची पाहणी