मुंबईकरांनो....तुमच्या खिशावर महापालिकेचा अजून एक डल्ला !
आधुनिक केसरी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन शुल्कात १३% वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. आधीच विविध विभागांत प्रचंड भ्रष्टाचार सुरू असताना, आता अधिक आर्थिक बोजा टाकण्याचा हा प्रयत्न म्हणजे ‘वरकरणी सफाई, आत भ्रष्टाचाराची कमाई’ असा प्रकार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकांना लोकशाहीचा विसर पडलेला दिसतो. तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधींशिवाय प्रशासक राज चालू आहे आणि आता मुंबईकरांवर नवा आर्थिक भार टाकला जातोय. हिशोब द्या – गेल्या तीन वर्षांत भ्रष्टाचार किती झाला? आणि आता नवीन पैसे का उकळायचे?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या याला तीव्र विरोध करतो. पक्षाचे प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी या वाढीला कडाडून विरोध दर्शवला आहे. ‘साफसफाई करा, पण आमच्या खिशावर दरोडा नको!’ हा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
जर ही अन्यायकारक १३% वाढ तातडीने मागे घेतली नाही, तर राष्ट्रवादी युवा काँग्रेस मुंबई महानगरपालिका आयुक्तांना घेराव घालेल. मुंबई महानगरपालिका ही जनतेची आहे, ठेकेदार, दलाल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची नाही! मुंबईकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला, तर ‘हिसाब चुकता केल्याशिवाय राहणार नाही!’
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List