मनोज जरांगेची नव्या वर्षात मोठी घोषणा, वाचा सविस्तर..!

मनोज जरांगेची नव्या वर्षात मोठी घोषणा, वाचा सविस्तर..!

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा अॅक्टिव झाले आहेत. (17 डिसेंबर) रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेत मोठी भूमिका जाहीर केली. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीमुळे जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. आता निवडणुका झाल्या, निकालही लागले आणि सरकार देखील स्थापन झाले.अशात जरांगे यांनी पुन्हा आपल्या मागण्यासाठी उपोषणाची तयारी केली आहे.यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्राद्वारे मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी हे उपोषण कधी होणार, कुठे होणार याबाबतची सर्व माहिती पत्रकार परिषदेत दिली.

“सरकारला वाईट वाटेल, पश्चाताप होईल, इतकं भयंकर आणि मोठं आंदोलन उभा केलं जाईल. मराठा समाजाच्या एकजुटीने सरकारचे डोळे विस्फारतील”, असं जरांगे म्हणाले. त्यांनी राज्यभरातील मराठ्यांना अंतरवली-सराटीला एकत्र जमण्याचे आवाहन केले. “अंतरवली-सराटीत तुफान ताकदीने मराठ्यांनी एकत्र यायचे एकाही मराठ्याने घरी थांबायच नाही, सर्वांनी इथे यायचे . “असे जरांगे म्हणाले. येत्या 25 जानेवारीपासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितले. ज्यांना स्वेच्छेने उपोषणाला बसायच आहे, ते बसू शकतात. पण कोणावरही जबरदस्ती नसेल असे जरांगे  यांनी स्पष्ट केले.

“मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. म्हणून मागच्या 15-16 महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. मराठ्यांची एकजूट कायम आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन कायम राहणार आहे. मराठा समाज इतक्या ताकदीने एकजुटीने लढला, तरी अजून मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेले नाही.त्यामुळे पुन्हा उपोषण केले जाईल”, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.







Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

CDCC बँक नोकर भरतीत घोटाळा : आमदार जोरगेवारांचा विधानसभेत आरोप तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षाच पाडली बंद. CDCC बँक नोकर भरतीत घोटाळा : आमदार जोरगेवारांचा विधानसभेत आरोप तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षाच पाडली बंद.
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रकरणाबाबत नेहमीच सातत्याने आरोप प्रत्यारोप होत असतात. गेल्या काही...
माजी मुख्यमंत्री कन्नमवारांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्याचे उदघाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे.
काँग्रेस कार्यालयावर भाजपचा भ्याड हल्ला, बहुमताच्या जोरावर ही मस्ती चालणार नाही
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक
मनोज जरांगेची नव्या वर्षात मोठी घोषणा, वाचा सविस्तर..!
माता महाकालीची महा आरती करत आमदार किशोर जोरगेवार यांनी दर्शवली विविध सामाजिक उपक्रमात उपस्थिती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया..!