डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक

आधुनिक केसरी न्यूज 

नागपूर : दि.१९ केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत केलेल्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी आज नागपूर येथील संविधान चौक ते विधानभवनपर्यंत 
महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आंदोलन केले. नागपूर येथील संविधान चौक इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून, अभिवादन करून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमकपणे आंदोलनाला सुरुवात केली. हातात बाबासाहेबांचे फोटो घेऊन व घोषणा देत सर्व आमदारांनी संविधान चौकापासून पायी विधानभवनात प्रवेश केला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर येत "बाबासाहेब का ये अपमान नही सहेगा हिंदुस्थान", "जय भीम, जय भीमच्या" जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या.

निवडणुकीपूर्वी - निवडणुकीनंतर आपले महापुरुष आणि देव बदलणे ही भारतीय जनता पक्षाची फॅशन आहे. भारतरत्न डॉ.आंबेडकर यांनी भारतात समतेचा स्वर्ग निर्माण केला, त्यामुळे आम्ही आंबेडकरांचे नाव घेतो आणि घेत राहणार.
सामान्य जनतेला आपले अधिकार आणि हक्क देणाऱ्या संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कधीच सहन केला जाणार नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

भाजपकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला आहे. हा त्यांचाच नव्हे तर संविधान आणि जनतेचा देखील अपमान आहे. बाबासाहेबांनी सर्व समाज घटकातील लोकांना न्याय दिला. जसं आम्हाला वाटतं अपमान झालाय तसं नितीश कुमार, रामदास आठवले आणि सत्तेतील मित्र पक्षांना वाटत नाही का? वाटत असेल तर त्यांनी आंदोलन केलं पाहिजे, रस्त्यावर उतरले पाहिजे. भाजपच्या मनातलं ओठावर आलंय अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली.विधान भवन परिसरात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर घोषणा देत  हा परिसर दणाणून सोडला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

कृषी महोत्सव आणि वधू, वर परिचय मेळाव्याचे एकत्रित आयोजन कृषी विकास व सामाजिक बांधिलकीचा संगम :आ.किशोर जोरगेवार कृषी महोत्सव आणि वधू, वर परिचय मेळाव्याचे एकत्रित आयोजन कृषी विकास व सामाजिक बांधिलकीचा संगम :आ.किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज   चंद्रपूर : कुणबी समाज नेहमीच मेहनती, प्रामाणिकपणा आणि परंपरांचे जतन यासाठी ओळखला जातो. या कृषी महोत्सवाच्या आणि...
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे : आ विजय वडेट्टीवार
विधानसभा निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला समर्पित
पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत गुंडांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी विद्यार्थ्यांचा बालहट्ट पुरवतात तेव्हा…
सुसंस्कृत राजकारणाचे पर्व संपले : विजय वडेट्टीवार
विनोद पाटील बोडखे यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या रिसोड तालुकाध्यक्ष पदी फेर निवड