कोरपना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : शिक्षण विभागाकडून कोरपना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन 22,23 व 24 डिसेंबर ला करण्यात आले आहेत विज्ञान प्रदर्शनी नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयात ठेवण्यात आली आहेत कार्यक्रमाच्या पत्रिकेत उद्घाटनाचे अध्यक्ष स्थानी जनार्दन ढोले यांचे नाव असून त्यांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ नांदा या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून दर्शविण्यात आले आहे जनार्दन ढोले यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती नाही,धर्मदाय आयुक्त यांची मान्यता नाही, क सुचित अध्यक्ष म्हणून नाव नाही असे असताना बेकायदा जनार्दन ढोले यांना संस्थेचे अध्यक्ष म्हणून पत्रिकेत टाकण्यात आले असल्याने या विरोधात माजी नगराध्यक्ष काँग्रेस नेत्या तथा संस्थेच्या अध्यक्षा सुनीता लोढीया यांनी शिक्षण अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली आहे आधीच प्रभू रामचंद्र विद्यालयात बोगस शिक्षिका भरती प्रकरण, बोगस मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरण सध्या चांगलेच गाजत असून आता प्रभू रामचंद्र विद्यालयात होणारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडले असून उद्घाटनाच्या कार्यक्रमता प्रभू रामचंद्र विद्यालय चालविणाऱ्या शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद नेमके कोणाकडे आहे हे माहीत होणार आहेत
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ,नांदा या संस्थेची मी कायदेशीर अध्यक्ष आहेत बोगसगिरी करून मुख्याध्यापकाची नोकरी बळकवणारे अनिल मुसळे यांचे कडून हा सर्व खटाटोप सुरू आहे शिक्षण विभागाने अशा बोगसगिरी करणाऱ्या व्यक्तींकडून सावधता बाळगली पाहिजे.
Comment List