काँग्रेस कार्यालयावर भाजपचा भ्याड हल्ला, बहुमताच्या जोरावर ही मस्ती चालणार नाही
आधुनिक केसरी न्यूज
नागपूर : दि २० संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान गृहमंत्री अमित शाह यांनी केला.त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसने शांतपणे आंदोलन केले. याविरोधात भाजप युवा मोर्चाने मुंबई काँग्रेस कार्यालयावर भ्याड हल्ला केला. यावर आज विजय वडेट्टीवार यांनी विधान सभेत स्थगन प्रस्ताव मांडला.या स्थगनवर बोलताना आ.विजय वडेट्टीवार म्हणाले , आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला करण्यात आला. दगड घेऊन काचा फोडल्या, खुर्च्या फेकण्यात आल्या. आमच्या नेत्या सोनिया गांधी , राहुल गांधी यांच्या फोटोवर शाई फेकण्यात आली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा फोटो फाडण्यात आला. या हल्ल्यात कार्यालयातील कर्मचारी जखमी झाले. काँग्रेस कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले. बहुमताच्या जोरावर सत्तेची मस्ती करत असतील ते योग्य नाही.
मिडीयाला दोन तास आधी भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनाची माहिती होती,पोलिसांना माहिती नव्हती का? असा सवाल ही आ. विजय वडेट्टीवार यनी उपस्थित केला. हा हल्ला होत असताना, कार्यालयाची तोडफोड होत असताना पोलिसांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.सरकारने याबाबत कारवाई करावी, विधानसभा अध्यक्ष कडून न्यायाची अपेक्षा आहे असे वडेट्टीवार म्हणाले.
Comment List