शिर्डीमधील पानमळा भागात बिबट्यासह चार बछडयांचा वावर
आधुनिक केसरी न्यूज
शिर्डी : शिर्डी शहरालगतच्या पानमळा या परिसरात अनिल कोते याच्या वस्तीवर तो अनेकांना दिसून आला आहे तो रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही मध्ये केंद्रीत झाल्यामुळे अनेकांनी चांगलाच धसका घेतल्याने कायम रहदारीचा असलेल्या परीसरात लवकरच निर्मनुष्य होत असल्याने या बिबट्याला वनखात्याने जेरबंद करावे अशी मागणी होत असून या परिसरात बागा व पाणी उपलब्ध असल्याने हा बिबट्याचा वावर वाढला असावा अशी शक्यता या भागातील महिला वर्गातून पुढे आली आहे साईबाबा संस्थान आधिकारी राजेद्र कोते यांच्या पेरु व मका बागेत चार बछडे व एक मादी दिसुन आली आहे बिबट्या मादी पाठोपाठ हि चार बछडे फिरताना बघण्यात आली आहे पेरूच्या बागेतील पेरु चोरी जात होते मात्र पेरु चोरणाऱ्यांनी बिबट्याचा धसका घेतल्याने पेरु चोरी बंद झाली आहे शिर्डी शहरात कायम साईभक्त भाविकांची वर्दळ असते संस्थान कर्मचारी हाॅटेल कामगार व मजुर तसेच आरती दर्शनासाठी जाणारे भाविक पहाटे घराबाहेर पडतात मात्र बिबट्या असल्याने काहीनी काळजी घेत बाहेर उशिरा पडत आहे वनविभागाच्या पथकाने भेट देऊन ठसे असलेल्या ठिकाणी भेट देऊन पहाणी केली असून या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली जात आहे
Comment List