चंद्रपूरात निघेल बांगलादेश हिंदुच्या समर्थनार्थ “न्याय यात्रा”
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : बांगलादेशातील हिंदू, सिख, बौध्द, जैन, ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समाजावर इस्लामिक अतिरेक्यानी मागील अनेक महिन्यापासून अत्याचार, ज्यात हल्ले, हत्या, लुटमार, जाळपोळ आणि महिलांचा अमानुष छळ सुरु केला आहे. या घटना रोखण्यासाठी योग्य ती पावेल उचलण्याएवजी संध्याचे बांगलादेश सरकार व इतर संबधित यंत्रणा मूक प्रेक्षक बनून राहिल्या आहेत. त्यांचा आवाज दाबण्यासाठी लोकशाही पद्धतीने आवाज उठवण्याचा अवलंब केला तेव्हा अन्याय आणि अत्याचाराचा एक नवीन टप्पा दिसून येतो आहे. हिंदुच्या अशा शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉनचे संन्यासी पूज्य श्री चिन्मय कृष्ण दास जी यांना बांगलादेश सरकारने अटक करणे अन्यायकारक आहे. या गंभीर प्रसंगी भारत सरकार व आंतरराष्ट्रीय संस्थांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून ते एकटे नसून संपूर्ण जग त्यांच्या पाठीशी आहे हा भाव व्यक्त करण्याकरीता चंद्रपुरात १० डिसेंबर २०२४ रोज मंगळवार ला दुपारी २.३० वाजता भव्य न्याय यात्रा निघणार असून यामध्ये संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून संपूर्ण सकल हिंदू समाज या न्याय यात्रेत सहभागी होणार आहे.न्याय यात्रा हि गांधी चौक येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगता होणार व जिल्हाधिकारी यांना सकल हिंदू समाज, चंद्रपूर तर्फे निवेदन देण्यात येणार आहे. या न्याय यात्रेत हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान सकल हिंदू समाज, चंद्रपूर तर्फे करण्यात येत आहे.
भव्य बाईक रॅली
10 तारखेळा च्या न्याय यात्रेच्या वातावरण निर्मिती साठी भव्य बाईक रॅली चे आयोजन 09- डिसेंबर 2024 ला करण्यात आले असून ही बाईक रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, पटेल हायस्कुल जवळ, चंद्रपूर येथून दुपारी 03.30 वाजता निघणार आहे .
रॅली मार्ग : पटेल हायस्कुल-गांधी चौक मार्गे-जटपूरा गेट- सिंधी कॉलनी मार्गे- वरोरा नाका- स्वातंत्र्यवीर सावरकर चौक- बस स्टँड- जटपूरा गेट- कस्तुरबा मार्गे - छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या भव्य बाईक रॅली ची सांगता होणार आहे.सर्व बंधू-भगिनींनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रपरिषदेत सकल हिंदू समाजद्वारे करण्यात आले आहे
Comment List