माजी मुख्यमंत्री कन्नमवारांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्याचे उदघाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे.
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री, जिल्ह्याचे सुपूत्र स्व. मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यानिमित्त १० जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ द्यावा, अशी विनंती आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेत त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. कर्मवीर मा. सा. कन्नमवार १२५ वी शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती चंद्रपूरच्यावतीने मा. सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविण्यात यावे, अशी विनंती आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. यावेळी सूर्यकांत खनके, डॉ. सुरेश महाकुलकर, संदीप गड्डमवार यांच्यासह अन्य उपस्थित होते. या सोहळ्यात स्मरणिकेचेही प्रकाशन केले जाणार आहे.
Comment List