आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्त मंगळावारी दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप कार्यक्रम.
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस १७ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. या प्रसंगी समाजासाठी विधायक कार्य करण्याच्या उद्देशाने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने राबवला जाणार असून गरजू दिव्यांग बांधवांना याचा लाभ होणार आहे.
या उपक्रमाद्वारे दिव्यांग बांधवांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणारी व्हीलचेअर्स, काठी, श्रवणयंत्रे, कुबड्या, कमोड चेअर, युरीन पॉट, एल बो स्टिक, वॉकर तसेच ईतर साहित्य वाटप करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर बनवून मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रोत्साहित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग बांधवांनी आपली नोंदणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी १६ डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत असून, यासाठी आधार कार्ड, दिव्यांगत्वाचा दाखला आणि संपर्क क्रमांक लागणारे साहित्य यांसारखी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. तरी दिव्यांग बांधवानी याचा घेण्याचे आवाहण भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comment List