सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे : आ विजय वडेट्टीवार

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे : आ विजय वडेट्टीवार

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : दि.२९  सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून इतका मोठा मोर्चा निघाला पण त्यानंतर देखील सरकार जागे झाले नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळणार नाही अशी मागणी आ.विजय वडेट्टीवार यांनी केली.संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अजून अटक होत  नाही. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अश्या मोठ्या घोषणा केल्या पण अजून अटक का होत नाही? वाल्मीक कराड हा सरकारचा जावई आहे का असा सवाल आ. विजय वडेट्टीवार यांनी विचारला. महाराष्ट्रात बीड मध्ये बिहार सारखी परिस्थिती झाली आहे. अनेक जमिनी लुटल्या, खंडणी मागितली जातात, महिलांवर अत्याचार होतात. संतोष देशमुख यांच्या हत्येसारखे प्रकरण होऊन पोलीस वाल्मीक कराडला अटक का करू शकत नाही? परभणीमध्ये भीमसैनिकांवर कारवाई करताना पोलिसांना धार येते मग बीडमध्ये पोलिसांना लकवा मारला आहे का, प्रश्न विचारत आ. विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांवर टीका केली.

संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून झाला, त्यांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाही का? याचा सूत्रधार वाल्मीक कराडची नार्को टेस्ट झाली पाहिजे.आतापर्यंत बीड मध्ये झालेल्या हत्या, खंडणी, महिला अत्याचार सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शेतकरी चिंताग्रस्त, धान खरेदीची मुदत वाढवून द्यावी वडेट्टीवार यांची मागणी शेतकरी चिंताग्रस्त, धान खरेदीची मुदत वाढवून द्यावी वडेट्टीवार यांची मागणी
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर, : गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागातील धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे. सरकारकडून धान खरेदी करीता...
तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..!
कृषी महोत्सव आणि वधू, वर परिचय मेळाव्याचे एकत्रित आयोजन कृषी विकास व सामाजिक बांधिलकीचा संगम :आ.किशोर जोरगेवार
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे : आ विजय वडेट्टीवार
विधानसभा निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला समर्पित
पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत गुंडांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी विद्यार्थ्यांचा बालहट्ट पुरवतात तेव्हा…