तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..!

तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..!

आधुनिक केसरी न्यूज 

गोंडपिपरी : दि. ०१गोंडपिपरी तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार यांनी आज राजुरा येथील भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालयात आमदार श्री. देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यावेळी आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी त्यांचे गळात पक्षाचा दुपट्टा टाकून भाजपात स्वागत केले.राजुरा विधानसभेचा निकाल हा ऐतिहासिक असाच ठरला. देवराव भोंगळे हे तिसऱ्या क्रमांकावर राहतील अशी भाकीत मांडणाऱ्या राजकीय पंडीतांचे सर्व दावे चुकीचे ठरवत भाजपचे देवराव भोंगळे हे चार माजी आमदारांना शह देत निवडून आले. थेट जनसंपर्क, गोरगरीबांच्या सेवेला धावून जाण्याची आत्मियता आणि प्रभावी प्रचारयंत्रणा हे भोंगळेंच्या विजयासाठी जमेची बाजु ठरले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केले. 

निवडणुकीच्या प्रचारपुर्व काळापासूनच देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तरूणांची भाजपला पसंती दिसून येत होती. श्री. भोंगळे आमदार झाल्यानंतर  राजुरा विधानसभेत पक्षप्रवेशाचा वेग वाढला असून आमदार भोंगळे यांच्या नेतृत्वात विधानसभेत दररोज शेकडो प्रवेश होत आहेत. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता भाजपात जोरदार इनकमिंग होत असल्याची नागरीकांमध्ये चर्चा आहे. 

पुर्वाश्रमीचे भाजप कार्यकर्ते असलेले संगमवार हे मध्यंतरीच्या काळात कॉंग्रेसमध्ये गेले होते. परंतू देवराव भोंगळे निवडून येताच 'विकासाचा वादा, देवराव दादा' म्हणत ते पुन्हा भाजपवासी झाले. यावेळी तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार, जिल्हा उपाध्यक्ष बबन निकोडे, तालुका महामंत्री निलेश पुलगमकर, जेष्ठ नेते दिपक बोनगिरवार,  बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे, भाजयुमोचे महामंत्री व बाजार समितीचे उपसभापती स्वप्नील अनमूलवार, साईनाथ मास्टे, सुहास माडूरवार, सुरेश धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भूमिपुत्रचा लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी - विष्णुपंत भुतेकर भूमिपुत्रचा लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी - विष्णुपंत भुतेकर
    रिसोड: भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या सहाव्या  वर्धापन दिनानिमित्त एक जानेवारीला जिल्ह्यातील तथा जिल्हा बाहेरील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत  भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून वाशिम
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्यानंतर चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजच्या साहित्य खरेदी प्रक्रियेला वेग.
शेतकरी चिंताग्रस्त, धान खरेदीची मुदत वाढवून द्यावी वडेट्टीवार यांची मागणी
तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..!
कृषी महोत्सव आणि वधू, वर परिचय मेळाव्याचे एकत्रित आयोजन कृषी विकास व सामाजिक बांधिलकीचा संगम :आ.किशोर जोरगेवार
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे : आ विजय वडेट्टीवार
विधानसभा निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला समर्पित