भूमिपुत्रचा लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी - विष्णुपंत भुतेकर

भुमिपुत्र शेतकरी संघटनेकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन

भूमिपुत्रचा लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी - विष्णुपंत भुतेकर

 

रिसोड: भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या सहाव्या  वर्धापन दिनानिमित्त एक जानेवारीला जिल्ह्यातील तथा जिल्हा बाहेरील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत  भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून वाशिम येथील जिल्हा कार्यालयावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व शेतकरी सन्मानासाठी कायम चालू राहील याची ग्वाही दिली.

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत मिळावी म्हणून एक लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सहया गेल्या सोळा डिसेंबर पासून आज पर्यंत घेण्यात आल्या त्या राज्य शासनाला पाठवन्यात आल्या. भूमिपुत्रच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या व उपस्थित मानायवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 

यावेळी भूमिपुत्रचे वाशीम तालूका अध्यक्ष संतोष सुर्वे यांची निवासी जिल्हाअध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. रिसोड युवक तालूका अध्यक्ष पदी शंकर सदार यांची तर  कोल्हापूर जिल्हाधक्ष पदी ड्रा. संतोष सुतार आणि कोल्हापूर महिला जिल्हा अध्यक्ष पदी ड्रा. सौ. साक्षीताई सुतार यांची निवड करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा पन्हाळा तालूका अध्यक्ष पदी किरण मस्कर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. केंद्र सरकारने खताची भाव वाढ रद्द केल्यामुळे भूमिपुत्र कडुन सरकारचे अभिनंदन करण्यात आले. तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदती साठी आंदोलन  करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

वर्धापन दिन बैठकीसाठी अकोला जिल्हाअध्यक्ष संजय मालोकार,  जिल्हाध्यक्ष रामेश्वर, अवचार, ड्रा.जितेंद्र गवळी, संतोष सुर्वे, ड्रा. तृप्ती गवळी, देव इंगोले,  बालाजी बोरकर, रवींद्र चोपडे, राजेश डांगे, भीमराव खोडके, देवेंद्र लांडकर, विनोद घुगे, श्रीरंग नांगरे,ड्रा. अमर दहीहंडे, विलास गहुले,सीताराम लोखण्डे, शंकर सदार,  दीपक सदार, गजानन जाधव, उद्धव इढोले, बाळू बर्डे, गजानन काकडे, कपिल भालेराव,जगनराव देशमुख, रवींद्र चोपडे, विकास झुंगरे, वैजिनाथ रंजवे, सीताराम इंगोले, गणेश लांभाडे, संतोष महाकाळ, बाबाराव आढाव, राजू भोयर, भटू  नाईक चव्हाण, संतोष गव्हाणे, देवमन पाटील गहुले, अशोक भगत,  रवी लाहे,  जगन गरकळ, नारायण तायडे, अंकुश काळे, सुभाष पाटील बांडे,सचिन मानके, जगन गरकळ, बाळू आवले, शंकर सरोदे सह भूमिपुत्र चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्माचे संचालन देव इंगोले यांनी तर आभार निवासी जिल्हाधक्ष संतोष सुर्वे यांनी मानले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भूमिपुत्रचा लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी - विष्णुपंत भुतेकर भूमिपुत्रचा लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी - विष्णुपंत भुतेकर
    रिसोड: भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या सहाव्या  वर्धापन दिनानिमित्त एक जानेवारीला जिल्ह्यातील तथा जिल्हा बाहेरील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत  भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून वाशिम
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्यानंतर चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजच्या साहित्य खरेदी प्रक्रियेला वेग.
शेतकरी चिंताग्रस्त, धान खरेदीची मुदत वाढवून द्यावी वडेट्टीवार यांची मागणी
तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..!
कृषी महोत्सव आणि वधू, वर परिचय मेळाव्याचे एकत्रित आयोजन कृषी विकास व सामाजिक बांधिलकीचा संगम :आ.किशोर जोरगेवार
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे : आ विजय वडेट्टीवार
विधानसभा निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला समर्पित