सकल हिंदू समाजातर्फे बांगलादेशातील हिंदुच्या समर्थनार्थ “न्याय यात्रा”
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : बांगलादेशातील हिंदू, सिख, बौध्द, जैन, ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समाजावर इस्लामिक अतिरेक्यांनी मागील अनेक महिन्यापासून अत्याचार सत्र सुरु केला आहे. ज्यात हल्ले, हत्या, लुटमार, जाळपोळ आणि महिलांचा अमानुष छळ, हिंदू आणि अल्पसंख्यांकांच्या धर्मिक स्थळांची विटंबणा सुरु केली आहे. या घटना रोखण्यासाठी योग्य ती पावेल उचलण्याऐवजी सध्याचे बांगलादेश सरकार व इतर संबधित यंत्रणा मूक प्रेक्षक बनून राहिल्या आहेत. त्यांचा आवाज दाबण्यासाठी लोकशाही पद्धतीने आवाज उठवण्याचा अवलंब केला तेव्हा अन्याय आणि अत्याचाराचा एक नवीन टप्पा दिसून येतो आहे. हिंदुच्या अशा शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉनचे संन्यासी पूज्य श्री चिन्मय कृष्ण दास यांना बांगलादेश सरकारने अटक करणे अन्यायकारक आहे.
या गंभीर प्रसंगी भारत सरकार व आंतरराष्ट्रीय संस्थांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून ते एकटे नसून संपूर्ण जग त्यांच्या पाठीशी आहे हा भाव व्यक्त करण्याकरीता चंद्रपुरात १० डिसेंबर २०२४ रोज मंगळवार ला दुपारी २.३० वाजता भव्य न्याय यात्रा काढण्यात आली आहे. या न्याय यात्रेत चंद्रपूर जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने नागरीक, महिला वर्ग उपस्थित होते. विविध समाजातील समाज बांधव, अल्पसंख्याक समाजातील धर्मगुरू, जेष्ठ नागरिक , महिला वर्ग व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, चंद्रपुर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार, मनीष महाराज या न्याय यात्रेत सहभागी झाले होते.न्याय यात्रा हि गांधी चौक येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगता झाली. निवासी जिल्हाधिकारी यांना सकल हिंदू समाज, चंद्रपूर तर्फे निवेदन देण्यात देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार ,जिल्हा संघचालक तुषार देवपूजारी, तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार, नगर संघचालक रवींद्रजी भागवत, आमदार किशोर जोरगेवार, शीख समाजाचे चमकौर सिंग, बौद्ध समाजाचे धम्म् भन्ते , इस्कॉन चे रमेश जी बिराजदार, स्नेहाताई मिसार, प्राजक्ता भालेकर ताई, अशोक जीवतोडे, शैलेश जी बागला, शवारकरी चे श्री मेश्राम आदींची उपस्थिती होती
प्रमुख मागण्या
बांगला देशातील हिंदूवरील अत्याचाराविरुद्ध तेथील सरकारला भारत सरकारकडून कठोर इशारा दिला जावा, मानवाधिकारवादी संघटनांनी हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकावरील हल्ल्याची, अत्याचाराची दखल घेऊन हा मुद्दा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लावून धरावा, बांगलादेशातील हिंदूंच्या जीविताचे आणि संपत्तीचे रक्षण तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घातला जावा, इस्कॉनचे साधू चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून तत्काळ स-सन्मान मुक्तता करण्यात यावी, हिंदू कलाकार, व्यावसायिक, उद्योगपती, खेळाडू, राजकीय नेते तसेच हिंदू मंदिरांना सुरक्षा पुरविली जावी, बांगलादेशातील पाकिस्तानी जिहाद्यांच्या हस्तक्षेपाला पायबंद घालावा, संयुक्त राष्ट्रसंघात हिंदू, बौद्ध, खिश्चन व अन्य अल्पसंख्यकांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला जावा, बांगलादेशातील अल्पसंख्य समाजाच्या रक्षणाची मागणी करणाऱ्या देशोदेशीच्या विविध आंदोलनांना सुरक्षा प्रदान केली जावी, इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मानवाधिकार आयोग व बॉलिवूड शांत का ?
यावेळी बोलतांना विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार म्हणाले की एरवी मानवाधिकार आयोग आणि बॉलिवूड मधील अभिनेते विशिष्ट समुदायाच्या बाबतीत लगेच आवाज उठवतात परंतु आता बांगला देशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर मात्र शांत आहेत. मानवाधिकार आयोग आणि बॉलिवूड चे अभिनेते काहीच भूमिका का घेत नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
Comment List