सहकार भरतीच्या विभाग सह प्रमुख पदावर विजय गोटे यांची निवड...
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : सहकार भारती जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष श्री विजय बळीराम गोटे यांची सहकार भारती शिर्डी येथील अधिवेशनात महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी मधे विभाग सहप्रमुख पदा वर नियुक्ती करण्यात आली.सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश चे 14 वे त्रैवार्षिक अधिवेशन दि. 21 व 22 सप्टेंबर रोजी साई पालखी निवारा, शिर्डी येथे उत्साहात संपन्न झाले. या ऐतहासिक अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय महामंत्री डॉ उदयराव जोशी, रिजर्व बँक चे संचालक श्री सतीश मराठे, प्रदेश अध्यक्षा श्रीमती शशिताई अहिरे, प्रदेश महामंत्री श्री विवेक जुगादे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये 36 जिल्ह्याचे 256 तालुक्यातून सुमारे 1100 प्रतिनिधी उपस्थित होते.
या अधिवेशनात सहकार भारती द्वारे प्रदान केले जाणारे स्व. अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार सोहळ्या मधे राजस्थान चे महामहीम राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे व राज्याचे महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. यांच्या हस्ते हा पुरस्कार इचलकरंजी चे श्री प्रकाश अण्णा आवाडे यांना देण्यात आला. सोबतच सहकार महर्षी या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे विमोचन झाले.सहकार भारती च्या या दोन दिवसीय अधिवेशन मधे पुढील 3 वर्षान साठी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी चे पुनर्गठन करण्यात आले , ज्यात महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदावर श्री विवेक जुगादे पुन्हा एकदा बिनविरोध निवडून आले तसेच प्रदेश सचिव पदावर श्री विनोद भिमनवार व नागपूर विभाग सहप्रमुख पदावर श्री विजय गोटे यांची निवड करण्यात आली .या बद्दल सहकार भारती जिल्हा चंद्रपूर चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यान कडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Comment List