नगर-मनमाड रस्त्याने घेतला निष्पाप वृद्धाचा बळी

रस्ता खोदला पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडले, आणखी किती बळी घेणार

नगर-मनमाड रस्त्याने घेतला निष्पाप वृद्धाचा बळी

आधुनिक केसरी न्यूज 

शिर्डी : राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावर सेल पेट्रोल पंपानजीक इर्टीगा कार व दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी रंगनाथ गंगाधर आरंगळे(वय-६१) यांचा  मृत्यू झाला आहे  
शिर्डीकडून शनिशिंगणापूरकडे परराज्यातील भाविक घेऊन चाललेल्या एम एच २० एफ जी-७०२७ या इर्टीगा कारने फॅक्टरीकरून लोणीकडे जनावरांच्या बाजारासाठी जात असलेल्या हिरो होंडा पॅशन क्रमांक एमएच १७ ए एस -१६२२ या दुचाकीस जोराची धडकी दिली. या धडकेत दुचाकीचालक रंगनाथ गंगाधर आरंगळे(वय-६१) यांचा जागीच मृत्यू झाला.तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले शंकर रामचंद्र शिंदे(राहुरी फॅक्टरी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी शहरातील लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सूरु आहेत. अपघातानंतर ईर्टीगा कारने तीन ते चार पलटी मारल्या. या ईर्टीगा कारमधील ओरीसा  राज्यातील सुस्मिता संतोष पुष्टी(वय-४६) हे जखमी असून त्यांच्यावर राहुरीत लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
 रंगनाथ आरंगळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात  तसेच जखमींना राहुरीत उपचारासाठी नेले. अपघातस्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकोन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. 
नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कामासाठी ठिकठिकाणी एक बाजूला रस्ता खोदला असून एकेरी वाहतूक सूरु आहे. नगर-मनमाड रस्त्याचे काम अतिशय संथगतीने व निकृष्ट पद्धतीने सूरु आहे. दुरुस्त केलेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या रस्त्यावर अनेक निष्पाप बळी गेले असून आणखी किती बळी हा रस्ता घेणार असा सवाल युवा नेते सुजित सुरेश वाबळे यांनी उपस्थित केला आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List