मोबाईलवर रिल्स बनवताना कार दरीत कोसळून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू 

रिव्हर्स गिअरमधे कार मागे घेताना व कल्च ऐवजी एक्सलेटरवर दाबल्याने सरळ कार डोंगरातून खाली 

मोबाईलवर रिल्स बनवताना कार दरीत कोसळून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू 

आधुनिक केसरी न्यूज 

खुलताबाद : तालुक्यातील सुलीभंजन दत्तधाम मंदिर परिसरात मोबाईलवर रिल्स बनविणाऱ्या युवतीला  आपला प्राण गमवावा लागला,तो कार दरीत कोसळल्याने सदरील घटना सोमवारी (दि.१७) सोमवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली. या घटनेतील मयत युवतीचे नाव श्वेता दिपक सुरवसे, वय २३ वर्षे रा. हनुमाननगर, औरंगाबाद असे आहे. या बाबत अधिक सविस्तर माहिती अशी श्वेता व तिचा मित्र सुरज संजय मुळे वय २५ रा.हनुमान नगर हे औरंगाबाद येथुन टोयाटो इटिऑस गाडी क्रमांक एम.एच.२१,बी.एच.०९५८ ने खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले. या ठिकाणी मोबाईलवर रिल्स बनविताना तिने मित्राला सांगितले की मी पण कार चालवून बघते. रिव्हर्स गिअर टाकताना एक्सलेटवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन अंदाजे ३०० फूट खाली कोसळून गाडीचा चक्काचूर झाले असून यात या युवतीचा मृत्यु झाला. सुलीभंजन येथील दत्त मंदिराराचा परिसर विहंगम असूून, पावसाळ्यात तो निसर्ग सौंदर्यांने अधिक खुलतो. त्यामुळे भाविक, पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. अशातच हे दोघेजण गुरुवारी (दि.१७) फिरायला आले. मोबाईलवर रिल्स बनवित असताना मृत्यूने हेरले व यातच तरुणीचा दुर्दैवी मृत्यू  झाला. मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षणस्थळावर कठडे असते तर ही घटना घडली नसती, असे पर्यटक व नागरिकांतून सूर ऐकव्यास मिळाले. दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List