अवैधरित्या जनावरांचे मांस वाहतूक करणाऱ्या वाहनास एक जण अटकेत 

अवैधरित्या जनावरांचे मांस वाहतूक करणाऱ्या वाहनास एक जण अटकेत 

आधुनिक केसरी न्यूज 

बल्लारपूर : तेलंगणात घेऊन जाणाऱ्या अवैधरित्या जनावराचे मांस वाहतूक करताना बल्लारपूर पोलीसांनी एका वाहन सहित २५ लाखाचा मुद्देमाल जप्त केले असून एका आरोपीला अटक केले आहे.

बल्लारपुर पोलीसांना मुखबिरच्या खबरेवरुन माहिती मिळाली की एका आयचर गाडी मधुन जनावराचे मांस तेलंगणात घेऊन जात आहे. सदर माहिती वरून मुख्य मार्गावरील जिओ कार्यालय जवळ सापळा रचला. एक आयचर गाडी भरधाव वेगाने येत असताना त्या वाहनाला थांबवून तपासले असता त्या वाहनात प्लॉस्टीकच्या आवरणात जनावराचे मास होते. सदर वाहनाचे मौका पंचनामा केले असता अंदाजे ८ लाख रुपयेचे जनावराचे मांस होते.
तसेच आयचर  वाहन क्रं. एम एच ४० ए के ४८७३ किंमत १७ लाख असे मिळून मुद्देमाल २५ लाख रुपये जप्त केले आहे. गाडी चालक आरोपी नामे मोहम्मद इमरान मोहम्मद इरशाद (३०) रा. कोळसा टाल कामठी जि. नागपुर याला अटक करण्यात आले. बल्लारपूर पोलीसांनी गुन्हा रजि. क्रं. ६६२/२०२४  कलम-४२९ भा. दं. वि. सहकलम- ५, ५ (सी),  ९, ९ (ए), ९ (बी)  महा. पशु संरक्षण अधिनियम १९७६ प्रमाणे गुन्हा नोंद केले आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर अतिरिक्त कार्यभार राजुरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रिडवार, पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, चापो. उपनिरीक्षक भास्कर कुंदावार, सफौ. गजानन डोहीफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोअं. वशिष्ट रंगारी, शेखर माधनकर, लखन जाधव, गणेश पुरडकर, राहुल घुडसे इ. स्टॉफ यांनी केली आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List