गिरडा घाटात भरपावसात रेस्क्यू: दोन बिबटे केले पिंजऱ्यात जेरबंद !

'अंबाबरवा'मध्ये सोडणार ! आरएफओ अभिजित ठाकरे यांची मोठी कारवाई 

गिरडा घाटात भरपावसात रेस्क्यू: दोन बिबटे केले पिंजऱ्यात जेरबंद !

आधुनिक केसरी न्यूज 

गोकुळसिंग राजपूत

सोयगाव : तालुक्यातील पिंपळवाडी येथूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या गिल्डा घाट दोन जिल्ह्यांच्या सिमेवर आहे बुलढाणा : जंगलाला लागून असलेल्या गिरडा परिसरात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात बिबट्यांनी धुमाकूळ घालत पाळीव जनावरांना ठार केले आहे. त्यामुळे वाहनधारक व गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते. मागणीनुसार वनविभागाने गावाजवळ पिंजरे लावले असता यात २७ जूनच्या रात्री दोन बिबटे अडकले आहेत. पिंजऱ्यात कैद या दोन्ही बिबट्यांना अंबाबरवा अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती बुलढाणा आरएफओ अभिजित ठाकरे यांनी विभागीय संपादक गोकुळसिंग राजपूत यांच्याशी बोलताना दिली आहे.
हल्ल्याच्या घटनेनंतर बुलढाणा वनविभागाने गिरडा गावालगतच एक पिंजरा लावला होता. काल रात्री एक मादी बिबट्या या पिंजऱ्यात अडकली व त्याच्या अवतीभोवती दोन पिल्ले फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर वनविभागाने तत्काळ दुसरा पिंजरा लावला. त्यात ही एक बिबट्याचा बछडा अडकला. या ठिकाणी अजून बिबटे असल्याने आता तिसरा पिंजरासुद्धा लावण्यात आला आहे. एकाच वेळी २ पिंजऱ्यांत दोन बिबटे अडकल्याने गिरडा गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.बिबट्याने गुरांवर केला होता हल्ला, शेतकरी भयभीत झाले होते या अनुषंगाने बुलडाणा तालुक्यातील गिरडा हे गाव अजिंठा पर्वतरांगेवर वसलेले आहे.
गावाला लागूनच घनदाट जंगल असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंस्त्र प्राण्यांचा अधिवास आहे. अनेक वेळा बिबट्या, अस्वल, तडस सारखे वन्यप्राणी गावातदेखील दाखल होतात. मागील काही महिन्यांपासून परिसरात बिबट्या सतत दिसत असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण होते. अशात एका शेतकऱ्याची गीर जातीच्या गायीला बिबट्यांनी ठार केले होते.आरएफओ अभिजित ठाकरे यांच्या नेतृत्वात वनपाल स्वप्नील वानखेडे, वनरक्षक प्रदीप मुंडे, बाळासाहेब घुले, रेस्क्यू टीमचे संदीप मडावी, अमोल चौहान, दीपक गायकवाड, प्रवीण प्रोनने तनमत्तर टीपक्त मोनने रेतन
तायडे यांनी राजू गायकवाड इतर गावकऱ्यांच्या मदतीने काल रात्री भरपावसात दोन्ही बिबट्यांना फिजिकल रेस्क्यू करून बुलढाणा येथील उपवन संरक्षण कार्यालयात आणले. आता अंबाबरवा अभयारण्यात सोडणार आहे

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List