बिबट्याच्या हल्यात शाळकरी मुलगा ठार 

भांबरवाडी शिवारातील बिबट्याचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करू : लखन चव्हाण

बिबट्याच्या हल्यात शाळकरी मुलगा ठार 

आधुनिक केसरी न्यूज 

गोकुळसिंग राजपूत 

कन्नड : तालुक्यातील भांबरवाडी येथे हदय पिळवटुन टाकणारी घटना घडली. बिबट्याच्या हल्यात रूषीकेश विलास राठोड वय 14 वर्ष या मुलाचा मृत्यु झाला असुन ही घटना म्हणजे अत्यंत दुर्दैवी मनाला सुन्न करणारी घटना आहे. 
सदर घटना ही जंगली हिंसक प्राण्यापासून झाल्याने नागरीक चांगलेच आक्रमक झाले चे दिसुन येत आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून या प्राण्यांचा गावकऱ्यांना त्रास होत होता गावकऱ्यांनी वारंवार वनविभागाला सूचना देऊनही या प्राण्यांवर कुठलाही प्रतिबंध घालण्यात आला नाही. जर का वनविभागाने वेळीच दखल घेतली असती तर सदर घटना ही घडली नसती. सदर घटनेमुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी लवकरात लवकर या प्राण्यांवर प्रतिबंध घालण्यात यावे व ऋषिकेश यांच्या घरच्यांना शासनाने जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी व त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास वनविभागात नोकरी द्यावी असे समाज सेवक लखन चव्हान यांनी दुरध्वनी वरून सांगीतले तसेच वनविभागाच्या ढिसाळ कारभारा मुळे एका मुलाला जिव गमवा  लागला आहे म्हणुनच या वनविभाच्या वरीष्ट अधिकारी यांच्यावर कारवाही करावी असे पत्र व प्रत्यक्ष वन मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहे असेही सांगीतले रुषीकेश याचे श्वव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्नलयात दाखल केले आहे बिबट्याचा हल्ला आहे की घात पात याचा तपास साहयक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे, पोलीस हेड कॉ . धिरज चव्हाण, रविद्र ठाकुर करत आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चितळच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू  चितळच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू 
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : बाबुपेठ जुनोना रस्त्यावर चितळच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली....
शिर्डी शहरावर आता सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची नजर : उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे
अवैधरित्या जनावरांचे मांस वाहतूक करणाऱ्या वाहनास एक जण अटकेत 
प्रा.सायली लाखे पिदळी यांचा करियर कट्टा द्वारा सन्मान
खबरदार....! एक रुपयात पिक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास....
राज्यपालांच्या अभिभाषणाला कडाडून विरोध : जयंत पाटील म्हणतात...आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय याशिवाय....
खळबळजनक घटना ; जमीन  नावावर करुन देत नाही म्हणून वडीलांचा खुन