खबरदार....! एक रुपयात पिक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास....

विमा भरण्यासाठी आगाऊ पैसे मागणाऱ्यांची कृषी हेल्पलाइनच्या व्हाट्सअपवर किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन

खबरदार....! एक रुपयात पिक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास....

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपयात पिक विमा भरणे चालू आहे, मात्र राज्यात काही ठिकाणी सीएससी केंद्रचालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाच्या वर अवैधरित्या काही आगाऊ रक्कमा वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, आगाऊ पैसे वसूल करणाऱ्या केंद्रचालकांची पुराव्यासह तक्रार आल्यास आपण त्यांच्यावर कारवाई करणार असून अशा लोकांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. 

याबाबत धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागणाऱ्या सीएससी केंद्रचालकांची शक्य असेल त्या पुराव्यासह राज्य शासनाचा कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 9822446655 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी असे आवाहन केले आहे. 

दरम्यान सदर केंद्रचालकांवर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे. 

शेतकऱ्यांना पिक विम्याचा एक अर्ज भरण्यासाठी एक रुपया इतकीच रक्कम पोर्टलवर भरणे अपेक्षित आहे तर यासाठी संबंधित केंद्रचालकाला शासनाकडून प्रति विमा अर्ज ४० रुपये मानधन दिले जाते. मात्र काही केंद्रचालक सात-बारा ऑनलाइन काढणे, पेरणी प्रमाणपत्र यासारख्या बाबींच्या नावाने शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागत असल्याच्या तक्रारी येत आहेत, या विरोधात आता धनंजय मुंडे यांनी अधिक कडक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List