शिर्डी शहरावर आता सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची नजर : उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे

शिर्डी शहरावर आता सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची नजर : उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे

आधुनिक केसरी न्यूज 

शिर्डी  : वाढत्या गुन्हेगारीला लगाम बसवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली  नगर जिल्ह्यात प्रयत्न सुरू आहे त्या अनुषंगाने शिर्डी शहरात देखील गुन्हेगारी रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू असून    वाहनचोरी दुचाकी चोरी धुमस्टाईल चोरी घरफोडी  बेशिस्त वाहतुक असे प्रकार रोखण्यासाठी शिर्डी शहरात आत  व बाहेर येणारे जाणारे  रस्ते उपनगर चौक महत्त्वाचे ठिकाणे  युध्दपातळीवर जास्त उच्च क्षमता असलेले सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू असून  ८०कॅमेरे बसवण्यात आले असून जवळपास आणखी मोठ्या प्रमाणावर कॅमेरे बसवण्याचे काम अविरतपणे सुरू झाले असून त्यामुळे दुचाकी व धुमस्टाईल चोरीला आळा बसल्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सांगत आता शिर्डी शहरावर आता सी सी टीव्ही माध्यमातून तिसऱ्या डोळ्याची देखील बारीक नजर राहणार असल्याने सागुन हे कॅमेराचे  कंट्रोलिंग शिर्डी पोलीस स्टेशन नियंत्रण कक्षात राहणार आहे त्या ठिकाणी बसवलेल्या सर्व टिव्हीवर हे चित्रन पोलीसांना बघता येणार असल्याचे सागुन संशयित गुन्हेगार पकडण्यासाठी शिर्डी पोलीसांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले
  शिर्डी साईबाबा मंदिर हे आंतरराष्ट्रीय  दर्जाचे दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान आहे देशभरातुन साईभक्त भाविक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने शिर्डी शहरात नेहमीच मोठी गर्दी होत असते शिर्डी शहर उपनगरे महत्त्वाचे चौक शिर्डी शहरात कोणत्याही बाजुने जरी प्रवेश केला तरी तो या अती उच्च दर्जाचे कॅमेरात सहजपणे केद्रीत होणार आहे  त्याचबरोबर  शिर्डी शहरात सुरक्षेसाठी नेहमीच खबरदारी घेतली जाते  त्याबरोबरच  बेशिस्त वाहनचालक कुठेही रोडवर वाहने उभे करणारे टिबल शिट चालवणारे दुचाकी चालक  टवाळखोर  रस्यांवर  वाढदिवस साजरे करणारे  यांच्यावर  देखील सी सी टीव्हीची नजर राहणार आहे    यातील काही कॅमेरे सुरू देखील झाले आहे राहीलेले कॅमेरे देखील लगतच्या काळात सुरू होणार असून त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून ज्या ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उंच पोल उभे करून चारही बाजूंनी येणारे जाणारे वाहने दुचाकी चालक नागरिक देखील यात स्पष्ट पणे दिसणार आहे 
            
    तिसऱ्या डोळ्याची नजर
 पोलीसानसाठी  फायदेशीर
   उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे  
 शिर्डी शहर परीसर नगर मनमाड महामार्ग उपनगरे महत्त्वाचे ठिकाणे शहरात येणारे व बाहेर जाणारे रस्ते गर्दिचे ठिकाण  ज्या ठिकाणी गुन्हे घडले आहे असे ठिकाण साईबाबा हाॅस्पिटल साईनाथ हाॅस्पिटल  मंदिर परीसर अशा सर्व ठिकाणी  साईभक्त भाविकांचा मोठ्या प्रमाणावर गर्दी असते अशा महत्त्वाचे ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही बसवले आहेत काही ठिकाणी बसवले जात आहे त्याचा गुन्हेगारी रोखण्यासाठी फायदा होईल

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List