चकला बोरगाव येथे रंगला माऊलीच्या अश्वाचा पहीला रिंगण सोहळा

चकला बोरगाव येथे रंगला माऊलीच्या अश्वाचा पहीला रिंगण सोहळा

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके

पैठण  : संत ज्ञानेश्वर महाराजांची : पालखी सोहळा शनिवारी आषाढी वारीसाठी पैठणहून पंढरपूरकडे  मार्गस्थ झाला . या पालखीचा पहिला रिंगण सोहळा मंगळवारी दुपारी १२ वाजता चकला बोरगाव  (  जि . बिड ) येथे उत्साहात पार पडला . हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठविताना हजारो वारकऱ्यांनी विठुनामाचा गजर केला . संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यात तीन  रिंगण पार पडतात . त्यापैकी पालखीतील पहिले रिंगण  मंगळवारी  चकलख बोरगाव या गावात पार पडले . वारकरी संप्रदायात शेकडो वर्षापासून पालखीला रिंगण सोहळ्याची परंपरा आहे . वारीत चालून थकलेल्या वारकर्यांना या माऊलीच्या अश्वाच्या रिंगण सोहळ्यामुळे उर्जा मिळते हे तितकेच खरे आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List