जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले माऊलींच्या पालखी रथाचे सारथ्य 

आपेगावहुन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले माऊलींच्या पालखी रथाचे सारथ्य 

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके

पैठण : टाळ, मृदंगाचा गजर आणि संत ज्ञानेश्वर माउलीचा जयघोष व असंख्य वारकरी, भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने  शनिवारी  29 रोजी सकाळी ८ वाजता श्रीक्षेञ अापेगांवहुन निघुन आगरनांदर येथे पहीला विसावा घेवुन दुपारी २ वा कुरणपिंपरी मार्गे  पंढरपुरकडे मार्गस्थ झाली.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पाई पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी 
खासदार डॉ.कल्याण काळे, यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेवून पालखी रथात ठेवुन पाई जाण्यार्या सर्वच वारकरी भाविकांना शुभेच्छा दिल्या.प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर अध्यक्ष ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूर यांनी संस्थानच्या वतीने खासदार डॉ.कल्याण काळे यांचे शाल श्रीफळ देवुन सत्कार केला.
माजी आमदार संजय वाघचौरे, दत्तात्रय गोर्डे,रवींद्र काळे,भाऊसाहेब औटे,व्हॉ.चेअरमन प्रल्हाद औटे,प्रा.युवराज औटे,रामकाका औटे,माजी सरपंच अशोक औटे यांनी माऊली तसेच मातापिता पादुकाकाचे दर्शन घेतले.
माऊली पालखीच्या पहिल्या विसावा माऊली पेट्रोल पंप आपेगाव येथे संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सपत्नीक  दर्शन घेत ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात फुगडीचा आनंद घेवून विण्याची सेवा करत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचे सारथ्य करुन आनंद साजरा करत वारकरी भाविकांना शुभेच्छा देवुन आपेगाव येथील पालखी सोहळ्यास पंढरपुर कडे मार्गस्थ होताना निरोप दिला.त्यांच्या सोबत 
तहसीलदार सारंग चव्हाण,मुख्याधिकारी संतोष आगळे,सौ.करूना दिलीप स्वामी,दिलीप बावस्कर,मंडळ अधिकारी चित्रा धाडेकर,अश्विनी शेळके,सह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List