भर रस्त्यावर जाळले प्रेत 

लळींग गावात स्मशानभूमीची दुर्दशा ; लोकांच्या भावनेशी खेळ

भर रस्त्यावर जाळले प्रेत 

आधुनिक केसरी न्यूज 

धुळे : जिल्ह्यातील लळींग गावात गेल्या 75 वर्षापासून स्मशानभूमीची  अवस्था खूप बिकट आहे त्या ठिकाणी प्रेत जाळण्यासाठी अनेक वर्षापासून  सोयीनुसार स्मशानभूमी नाही त्या जागेवर मंजूर झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे त्या ठिकाणी अर्धवट बांधकाम करून स्थानिक लोकांच्या भावनेशी खेळ केला आहे अनेक दिवसापासून भर रस्त्यावर प्रेत जाळले जात आहे काही संतप्त नागरिकांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या ठिकाणी अनेक राजकारण्यांना  त्यांनी व्यथा मांडली आहे परंतु कोणीच या ठिकाणी दखल घ्यायला तयार नाही असा आरोप करण्यात आला आहे. अर्धवट झालेल्या कामासंदर्भात काही गावाच्या नागरिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप करण्यात आला आहे स्थानिक नागरिकांची मागणी आहे की प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन लळींग येथील स्मशानभूमीचे काम तात्काळ सुरू करावे असे या ठिकाणी सांगितले आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List