प्रा.सायली लाखे पिदळी यांचा करियर कट्टा द्वारा सन्मान

प्रा.सायली लाखे पिदळी यांचा करियर कट्टा द्वारा सन्मान

आधुनिक केसरी न्यूज 

नागपूर :: जिल्ह्यातील बोखरा स्थित  रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथील  करियर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक तथा मराठी विभाग प्रमुख प्रा. सायली लाखे पिदळी यांना 
नुकतेच करियर कट्टा द्वारे सन्मानित करण्यात आले .
         महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि नेस वाडिया कॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा विशेषांक प्रकाशन सोहळा 28 जून 2024 रोजी पुणे येथे नुकताच पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्ष मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर (संचालक, उच्च शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन), प्रमुख पाहुणे मा.डॉ.सचिन सानप (विश्वस्त, मॉर्डन एज्युकेशन सोसायटी, पुणे), मा. डॉ. वृषाली रणधीर (प्राचार्या नेस वाडिया कॉलेज, पुणे), महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र मा. अध्यक्ष यशवंत शितोळे, मा. प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील (अध्यक्ष राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समिती), मा. डॉ. प्रभाकर घोडके ( सचिव, राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समिती), प्रा. सायली लाखे पिदळी( सदस्य, राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समिती)मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन व झाडाला जल अर्पण करून आणि महाराष्ट्र गीताने झाली. 
या कार्यक्रमाचे निमित्ताने करिअर कट्टा विशेषांक 2024 ची विशेषांक संपादनाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडल्याबद्दल मा. प्राध्यापक सायली लाखे पिदळी (सदस्य , राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समिती ) यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. 
प्राध्यापक वृंदांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहात दिमाखदार आणि अभ्यासपूर्ण असा हा  विशेषांकाचा प्रकाशन सोहळा यशस्वीरित्या पार पडला. प्रा. सायली लाखे पिदळी यांच्या पुणे येथील भव्य कार्यक्रमात झालेल्या सत्काराबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे . 
          रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका तथा करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक  प्रा. सायली लाखे पिदळी यांनी याबाबत संस्थेचे संचालक मा. डॉ. मारोती वाघ, संचालिका मा. सौ. लता वाघ आणि प्राचार्या डॉ.अर्चना कहाळे पत्की व विशेषत्वाने करिअर कट्टा परिवाराचे मनापासून आणि कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले आहेत .

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List