कंधार नगरपरिषदचा अतिक्रमण धारकांना दणका

अनधिकृत अतिक्रमण जेसीबीने हटविले ! मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास!

कंधार नगरपरिषदचा अतिक्रमण धारकांना दणका

आधुनिक केसरी न्यूज
 

धोंडीबा मुंडे
    
कंधार : नगर परिषद प्रशासनाने  दि.२७ जून २०२४ रोज गुरुवारी दुपारी जेसीबी मशीनच्या साह्याने पंचायत समिती कार्यालय, महाराणा प्रतापसिंह चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमण हटवून अतिक्रमण धारकांना मोठा दणका दिल्यामुळे अखेर मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे, त्यामुळे वाहनधारकासह पादचाऱ्यामधून आनंद व्यक्त केला जात आहे. 
      कंधार पंचायत समिती कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर काही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटला होता, त्यामुळे मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनास व पादचाऱ्यास वारंवार अडथळा निर्माण होत होता, ही बाब शहरातील काही जागरूक नागरिकांनी तोंडी व लेखी निवेदनाद्वारे नगरपरिषदेच्या प्रशासनास लक्षात आणून दिली होती. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने वारंवार अतिक्रमण धारकांना तोंडी सूचना देऊनही सदरील अतिक्रमण काढून घेत नसल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने ठोस भूमिका घेत दि.२७ जून २०२४ रोज गुरुवारी दुपारी जेसीबी मशीनच्या सहाय्याने व पोलीस बंदोबस्तात सदरील अतिक्रमण हटविले. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्याने व कंधार पंचायत समिती कार्यालयाने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.
    कंधार चे तहसीलदार तथा नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव पथक प्रमुख दीपक झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषद कर्मचारी राजेश जोंधळे, राहुल खोडसकर, हरिदास कळसकर, बशीर पठाण, जमीर मोहम्मद, अझहर शेख, राकेश जोंधळे, सचिन म्हेसन्ना, श्रीकृष्ण वाघमारे, दिलीप कांबळे, सिद्धार्थ कांबळे, अब्दुल खादर, शेख जगन्नाथ निकम आधी सहनगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List