चितेवर झोपून भोकरला अनोखे उपोषण ; हाकेंच्या ओबीसी उपोषणास पाठिंबा

चितेवर झोपून भोकरला अनोखे उपोषण ; हाकेंच्या ओबीसी उपोषणास पाठिंबा

आधुनिक केसरी न्यूज 

भोकर : मागील आठवड्यापासून ओबीसी आरक्षण बचावासाठी वडीगोर्दि येथे लक्ष्मण हाके यांनी बेमुदत उपोषण प्रारंभ केले आहे. त्यांच्या उपोषण समर्थनासाठी येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारी (ता.२०)  येथील संजय दिंगबर गौड आलेवार या यूवकानी चक्क चितेवर झोपुन अनोखे बेमुदत ऊपोषण सूरू केले आहे.
तहसील कार्यालयास दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्यभर विविध ठिकाणी समाजाचे आंदोलन, उपोषण सूरू आहे. तरी  शासनाने ठोस निर्णय घेतला नाही.ऊलट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यासठी हालचाली सुरू केल्या आहेत.यास ओबीसी आरक्षण बचाव समीतिकडुन कडाडून विरोध केला जात आहे. याच निमित्ताने वडीगोर्दी येथे लक्ष्मण हाके व  वाघमारे यांनी बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे.आठवडा उलटला तरी शासनाने काहिच निर्णय घेतला नाही.त्याच्या ऊपोषणास समर्थन म्हणून गूरूवारी येथील तहसील कार्यालया समोर संजय दिंगबर गौड  आलेवार यांनी चक्कं सरणावर झोपून अनोखे बेमुदत उपोषण सूरू केल्याने येथील शासकीय अधिकारी व पोलीस सावध झाले आहेत. उपोषण स्थळी सरण रचण्यास विरोध केला असून भविष्यात काहि अपरिहार्य घटणा घडल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असा उपोषणकर्त्यास दम दिल्याने काहिकाळ तणाव निर्माण झाला होता. दोघांच्या समन्वयातून मध्यममार्ग काढून लोकशाही मार्गाने शांततेत उपोषण सुरू आहे.यावेळी रामेश्वर गौड महाराज, नागनाथ घिसेवाड, गोविंद गौड पाटील,नागोराव शेंडगे,बी.आर.पांचाळ, मिलींद गायकवाड,सूभाष नाईक,माधव अमृतवाड, अनंतवार मोघाळीकर, यांच्या सह बहूसंख्य ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List