वीज पडून चकलांबा येथील तीन महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी

आधुनिक केसरी न्यूज 

गेवराई : सर्वत्र सध्या खरिपाची लागवड आणि खुरपणीचे दिवस असून ग्रामीण भागातील महिला वर्ग सध्या शेतीच्या कामात गुंतलेला असताना आज दिवसभर वातावरणात बदल झाल्यामुळे ढग दाटून येत असताना विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत असताना चकलंब या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान सोसाट्याचा वारा विजेचे कडकडाटासह पाऊस पडत असताना शेतातील काम करणाऱ्या महिलांच्या अंगावर वीज पडून तीन महिला जागी ठार तर एक गंभीर जखमी झालेली घटना घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की गेवराई तालुक्यातील सर्वत्र शेतकरी महिला वर्ग कामात गुंतलेला असून थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसामुळे अनेकांनी कापूस तूर

सोयाबीन व अन्य पिकाची लागवड केली असून पिके जोमात असताना रिमझिम पडलेल्या पावसामुळे शेतात गवत निर्माण झाले आहेत तर शेतकरी वर्ग शेतात पाळी फवारणीचे काम करत आहे तर महिलावर्ग मात्र खुरपणीचे काम करत असताना चकलांबा परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडात सुरू झाला होता.

महिला वर्ग कामात गुंग असताना

थोड्याफार पडलेल्या पावसामुळे सर्वत्र कामाला गती मिळत नव्हती याचवेळी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चकलांबा परिसरात वीज पडल्याने शालनबाई शेषराव नजन वय ६५ यांची सुन लंका हरिभाऊ नजन वय ४० तर विजु बाई बाळासाहेब खेडकर वय४१ असा या बीज पडून मयत झालेल्या महिलांचं नाव आहे या तिन्ही महिला शेतात काम करत असताना आज

सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा जागेवरच वीज पडून मृत्यू झाला तिनी महिला चकलांबा येथील रहिवासी, असून त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्या असता त्यांना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केला आहे. यामध्ये यमुना माणिक खेडकर वय वर्ष ६५ या गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुढील इलाज आणि उपचार सुरू आहेत.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चितळच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू  चितळच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू 
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : बाबुपेठ जुनोना रस्त्यावर चितळच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली....
शिर्डी शहरावर आता सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची नजर : उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे
अवैधरित्या जनावरांचे मांस वाहतूक करणाऱ्या वाहनास एक जण अटकेत 
प्रा.सायली लाखे पिदळी यांचा करियर कट्टा द्वारा सन्मान
खबरदार....! एक रुपयात पिक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास....
राज्यपालांच्या अभिभाषणाला कडाडून विरोध : जयंत पाटील म्हणतात...आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय याशिवाय....
खळबळजनक घटना ; जमीन  नावावर करुन देत नाही म्हणून वडीलांचा खुन