डॉ.खत्री महाविद्यालयात क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : (का.प्र.) स्थानिक डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर येथे २६ व २७ जानेवारी २०२५ या दोन दिवसाकरीता क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळयाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ. एन. एच. खत्री सर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव डॉ. एस. बी. कपूर, संस्थेच्या कोषाध्यक्षा मा. प्रा. अनुश्री पाराशर मॅडम, सोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. काकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या महोत्सवाचं उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एन. एच. खत्री सर यांच्या शुभहस्ते झालं. उद्घाटन सोहळयाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे. काकडे यांनी केले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणांत डॉ. एन. एच. खत्री सर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोणातून असे उपक्रम होणे गरजेचे आहे. या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात.उद्घाटन सोहळयाचे संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संतोष कावरे यांनी केले तर मान्यवरांचे आभार शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. आशिष चहारे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Comment List