परंपरेला फाटा देत विधवा महिलांसाठी हळदी कुंकू; लक्ष्यवेधी स्पोट्रस फाऊंडेशनचा उपक्रम
पिंपरी: जुन्या रुढी-परंपरांना फाटा देत विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करून प्रबोधनातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कविताताई आल्हाट यांनी प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार विधवा महिलांचे हळदीकुंकू हा उपक्रम राबवला आहे.
पतीच्या निधनानंतर अनेक महिलांवर मोठी कौटुंबिक जबाबदारी येत असते. विधवा म्हणून त्यांना अनेकदा विविध कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी मर्यादा लावल्या जातात. प्रथा परंपरांच्या नावाखाली विधवा महिलांना वेगळी वागणूक दिली जाते. या प्रथांना फाटा देत विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांचा हळदी कुंकवाने मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आपल्याला पुन्हा एकदा समाजाच्या चालू परंपरेला फाटा देत आलल्या हळदीकुकू लागणार असल्याने क्रार्यक्रमाला आलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
तसेच प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार शहरध्यक्ष कविताई आल्हाट आणि जयश्री गाडे यांनी हा क्रार्यक्रम घेऊन विधवा महिलांचा सन्मान केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. जुन्या रुढींचा आधार देऊन दिला तिच्या कर्तृत्वाला झाकोळले जाते. या प्रथांना झुगारून तिचा सन्मान करण्यासाठी जयश्री गाडे यांनी विधवा महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेतला. या हळदीकुंकू सोहळ्यात अनेक महिलांना गहिवरून आले. तर अनेकींना अश्रू अनावर झाले.
Comment List