अर्थसंकल्पात मतदार संघात भरीव निधी द्यावा; जोरगेवार यांची मागणी 

अर्थसंकल्पात मतदार संघात भरीव निधी द्यावा; जोरगेवार यांची मागणी 

आधुनिक केसरी न्यूज 


चंद्रपूर : फरवरी महिना सुरू झाला की संबंध महाराष्ट्राला अर्थसंकल्पाचे वेध लागतात. या अर्थसंकल्पामध्ये आपल्याही मतदारसंघाला भरभरून निधी मिळावा या अनुषंगाने सर्वच आमदार सातत्याने प्रयत्नशील असतात. या दृष्टिकोनातूनच चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईतील मंत्रालयात राज्याचे वित्तमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मतदारसंघातील विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी विविध पायाभूत सुविधा, मूलभूत गरजा आणि प्रगतीशील प्रकल्पांवर भर देण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचा विकास जलद गतीने व्हावा यासाठी जोरगेवार सतत प्रयत्नशील असतात त्या दृष्टिकोनातून ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. येत्या अर्थसंकल्पात मतदारसंघातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आमदार  जोरगेवार यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मनपा मुख्य अग्निशमन अधिकारी लाच घेतांना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात  मनपा मुख्य अग्निशमन अधिकारी लाच घेतांना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात 
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील पेट्रोलपंपाला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्विकारताना महानगरपालीकेचे...
कुंभमेळाच्या पर्वावर दक्षिण काशी पैठण येथे भाविकांचे गोदावरीत शाही स्नान..!
अर्थसंकल्पात मतदार संघात भरीव निधी द्यावा; जोरगेवार यांची मागणी 
लाचखोर सरपंच व माजी सरपंच 'एवढ्या' लाखाची लाच घेतांना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात 
पैठणमध्ये एस.टी.भाडेवाडीविरोधात शिवसेनेच्या वतीने चक्का जाम....
देशभक्ती कृतीतून व्यक्त करा : आ.किशोर जोरगेवार
अशोक सराफ यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ; निवेदिता सराफ यांची प्रतिक्रिया म्हणाल्या..!