नागपूरचा निलेश जोगी ठरला आमदार श्रीचा मानकरी, मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव ठरला स्पर्धेतील आकर्षण

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजित विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा संपन्न

नागपूरचा निलेश जोगी ठरला आमदार श्रीचा मानकरी, मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव ठरला स्पर्धेतील आकर्षण

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या पटांगणावर आयोजित विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नागपूरचा निलेश जोगी आमदार श्री २०२५ चा मानकरी ठरला ठरला आहे. तर चंद्रपूरचा आशिष बिरिया बेस्ट पोझर आणि अकोल्याचा अहमद खान यांनी बेस्ट इम्प्रुव्हमेंट विजेतेपद पटकावले आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदार किशोर जोरगेवार आणि मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली आहेत. यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, भारतीय जनता पार्टीचे नेते दशरथ ठाकुर, राजेंद्र अडपेवार, तुषार सोम, माजी नगरसेवक विशाल निंबाळकर, संजय देवतळे, श्याम धोपटे, अमोल शेंडे, नकुल वासमवार, रशिद हुसेन, सलीम शेख, ताहीर हुसेन,करणसिंग बैस,  कार्तिक बोरेवार, सुमित बेले, हर्षद कानमपल्लीवार, राम जंगम,  नितीश गवळी, विनोद अनंतवार, आनंद रणशूर, असोसिएशनचे सचिव सुभाष लांजेकर, कोष्याध्यक्ष विवेक भुरटकर, सदस्य गणेश रामगुंडेवार आदींची मंचावर उपस्थिती होती.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. दरम्यान शनिवारी गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ यांच्या मान्यतेने तथा चंद्रपूर बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशनच्या सहकार्याने विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 55, 60, 65, 70, 75 आणि खुल्या अशा सहा वजनगटांत घेण्यात आली होती. यात चंद्रपूरसह नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यांतील 142 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. संध्याकाळी सहा वाजता 55 वजन गटाच्या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत 55 वजन गटात चंद्रपूरचा आशिष बिरिया, 60 वजन गटात बुलढाण्याचा दत्तात्रेय सावरकर, 65 वजन गटात अकोल्याचा संदीपसिंग ठाकुर, 70 वजन गटात अकोल्याचा सोहेब अहमद, 75 वजन गटात अकोल्याचा सोहेब साहिल यांनी प्रथम पारितोषिक मिळविले. तर या स्पर्धेत आमदार श्रीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत नागपूरच्या निलेश जोगीने बाजी मारत पहिल्या क्रमांकासाठी असलेले 55,555 रुपयांचे पारितोषिक जिंकत आमदार श्री 2025 चा मान पटकावला. तसेच बेस्ट पोझर म्हणून आशिष बिरियाला 33,333 रुपये आणि शिल्ड, बेस्ट इम्प्रुव्हमेंटसाठी अहमद खान याला 22,222 रुपयांचे पारितोषिक आणि शिल्ड देण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, बॉडी बिल्डिंग ही केवळ शरीराचा व्यायाम नाही, तर मनाच्या शिस्तीचा, मेहनतीचा आणि दृढ संकल्पाचा सर्वोच्च नमुना आहे. आपल्या समाजातील तरुणांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आजच्या युगात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. फिटनेस आणि व्यायामाच्या माध्यमातून केवळ शरीर सुदृढ होत नाही, तर मन आणि आत्माही उन्नत होतो. युवक व्यसनापासून दूर राहतो, आपल्यातील प्रत्येकाने आपल्या रोजच्या आयुष्यात व्यायामाला प्राधान्य दिलं पाहिजे. पुढे पण असे आयोजन आपण करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव यांनी स्पर्धकांना कसरत करण्याचे आवश्यक सल्ले देत आयोजनाचे कौतुक केले. यावेळी अभिषेक कारिमवार, अविनाश लोखंडे, राजू कोटेवार, विशाल शिंदे, प्रतीम पाटील, गौतम शंभरकर, योगेश देवतळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव ठरला आकर्षण

मिस्टर वर्ल्ड आणि तब्बल सात वेळा मिस्टर इंडिया राहिलेला नरेंद्र यादव हा स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरला. त्याला पाहण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी नरेंद्र यादव यांनीही सर्व बॉडी बिल्डरांना सुडौल शरीर तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका कुणी करु...
संविधान घ्या - संविधान द्या उपक्रम हळदी कुंकू समारंभात संविधानाचा जागर..!
शांत झोपेची कला आत्मसात करा..!
नागपूरचा निलेश जोगी ठरला आमदार श्रीचा मानकरी, मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव ठरला स्पर्धेतील आकर्षण
हवामानात होत असलेले बदल गांभीर्याने घेण्याची गरज   आंतरराष्ट्रीय परिषदेतील तिसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रातील सूर 
आई ही शिक्षण, मूल्य आणि शिस्त यांची पहिली शाळा :आ.किशोर जोरगेवार
पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या 10 संकल्पासह आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप