मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका कुणी करु नये तसे झाले तर ती टिका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

बालविकासमंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर रायगड पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर ज्यापध्दतीने शिंदे गटाकडून टिका करण्यात आली त्या टिकेला आनंद परांजपे यांनी आज पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. 

राज्यातील ३६ जिल्हयातील पालकमंत्री पदाचा शासननिर्णय घोषित झाला. मात्र रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्हयाच्या पालकमंत्री पदाबाबत महायुतीतील घटकपक्ष शिवसेना यांनी नाराजी व्यक्त करत असताना रायगड येथे ज्यापध्दतीचे मुंबई - गोवा महामार्ग अडवून आणि टायर जाळून जो असंसदीय पध्दतीने आंदोलन केले हा प्रयोग योग्य नव्हता असेही आनंद परांजपे म्हणाले. 

आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि मंत्री अदितीताई तटकरे व तटकरे कुटुंबिय यांच्याबद्दल जी भाषा वापरण्यात आली ती अशोभनीय... निंदनीय... निषेधार्ह आहेच शिवाय महायुतीच्या धर्माला गालबोट लावणारे आहे. लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आपले म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. एखादा निर्णय पटला नाही तर पक्षातील पक्षप्रमुखाकडे म्हणणे मांडायचे असते. पालकमंत्री पदाचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा असतो त्यामुळे अशाप्रकारे वक्तव्य करून वातावरण बिघडवण्याचा आणि मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत नाहीय ना अशी शंका आनंद परांजपे यांनी व्यक्त केली. 

पालकमंत्री पदाचा जो काही निर्णय झाला त्यानंतर रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. ज्यावेळी मुख्यमंत्री दाव्होस येथून येतील त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्यांच्याशी संवाद साधतील असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले. 

ज्यांना आपण आराध्य दैवत समजतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील रायगड राजधानीतील महाड येथे असा प्रकार घडतो याबद्दल दु:ख व्यक्त करतानाच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी मातांचा, भगिनींचा मानसन्मान कसा ठेवला याची आठवणही आनंद परांजपे यांनी यावेळी करुन दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा आमचा अभिमान असलेल्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याबद्दल ज्यापध्दतीने वक्तव्य करण्यात आली त्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच या भगिनीने आपले कर्तृत्व केवळ मंत्री म्हणून नाही तर जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या त्यावेळी आपल्या कामातून कर्तृत्वाचा ठसा उमटवला. मंत्री असताना रायगडमध्ये ज्या ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी स्वतः फिल्डवर राहून लोकांची सेवा केली. महाविकास आघाडीत चांगले काम केलेच शिवाय महायुतीत अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडला त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यावेळी दरमहा १५०० रुपयांचा लाभ थेट बँक खात्यात जमा केले. एखादी घोषणा जाहीर झाल्यावर ती कार्यान्वित करणे आणि यशस्वी करणे यासाठी अहोरात्र परिश्रम घ्यावे लागतात. ते परिश्रम अदितीताई तटकरे यांनी घेतले. राज्यातील २ कोटी ३५ लाख महिलांच्या खात्यात ती रक्कम जमा झाली आणि महायुतीला जे अभूतपूर्व यश विधानसभेत मिळाले त्यात मोठे योगदान मंत्री म्हणून अदितीताई तटकरे यांचे आहे हेही आवर्जून आनंद परांजपे यांनी सांगितले. 

गेले दोन दिवस सातत्याने अशोभनीय गोष्टी रायगड जिल्हयात घडत आहेत त्या निषेधार्ह आहेत. मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदाचे आपले म्हणणे किंवा आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी आपले म्हणणे त्यांचे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडायला हवे होते किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडायला हवे होते. परंतु तसे न करता आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका सुरू केली आहे ती कदापि खपवून घेतली जाणार नाही. 

भरत गोगावले आपण एका संविधानिक पदावर असताना रास्ता रोको करणे... टायर जाळणे एका अर्थाने ज्या मुख्यमंत्र्यांकडे कायदा व सुव्यवस्थेचे गृहखाते आहे ते बिघडवण्याचे काम संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने करु नये असा सल्लाही आनंद परांजपे यांनी दिला आहे. 

या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका कुणी करु...
संविधान घ्या - संविधान द्या उपक्रम हळदी कुंकू समारंभात संविधानाचा जागर..!
शांत झोपेची कला आत्मसात करा..!
नागपूरचा निलेश जोगी ठरला आमदार श्रीचा मानकरी, मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव ठरला स्पर्धेतील आकर्षण
हवामानात होत असलेले बदल गांभीर्याने घेण्याची गरज   आंतरराष्ट्रीय परिषदेतील तिसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रातील सूर 
आई ही शिक्षण, मूल्य आणि शिस्त यांची पहिली शाळा :आ.किशोर जोरगेवार
पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या 10 संकल्पासह आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप