Crime : वडिलांच्या डोक्यात गज मारून अल्पवयीन मुलीस पळवले

पोक्सोसह विविध गुन्ह्यात तीन आरोपींना अटक

आधुनिक केसरी न्यूज

निफाड :- पाचोरे बु.ता.निफाड येथील अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या डोक्यात गज मारून त्यांना जखमी करत बळजबरीने अपहरण केले. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात चार आरोपींच्या विरोधात पोक्सो सह विविध कलमानव्ये गुन्हा दाखल झाला आहे. यातील तीन आरोपींना पहाटे २ वाजता अटक करण्यात आली आहे.
  याबाबत पीडित मुलीचे वडील वय ४२ रा.पाचोरे बु.यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुध.दि.१५ जाने. रोजी सायं ७.३० वाजेच्या सुमारास पाचोरे  बु.ते लासलगाव रस्त्यावर प्राथमिक शाळेच्या पटांगणात आरोपी नवनाथ फक्कड नागरे, सजन लहानु सानप, रामा रतन नागरे, राहुल फक्कड नागरे सर्व रा.पाचोरे बु.यांनी संगनमताने फिर्यादी त्यांचे दुकान बंद करुन घरी जात असताना आरोपी नवनाथ नागरे याने एकसारखे फोन करून मराठी शाळेजवळ फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा त्यांना बोलावुन घेतले. तेथे आरोपी नवनाथ, सजन, रामा हे फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीसोबत बोलत उभे असतांना, आरोपी नवनाथ यांस फिर्यादीने विचारले की, 'काय काम आहे?' तेव्हा आरोपी सजन व रामा हे तेथुन बाजुला निघुन गेले तेव्हा आरोपी नवनाथ हा फिर्यादी यांना म्हणला की, 'माझे तुझ्या मुलीवर प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे.' तेव्हा फिर्यादीने त्यास समजावले की, ' तिचे सध्या लग्नाचे वय नाही. तिचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर बघू' याचा राग येवुन तो म्हणाला की, 'मला आत्ताच लग्न करायचे आहे. मला वेळ नाही, तु हो बोल नाहीतर, तुझ्या पोरीला घेवुन पळून जावुन तिचे सोबत लग्न करीन' असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताचे चापटीने कानाखाली मारुन फिर्यादी हे गाडीवरुन खाली उतरत असताना आरोपी नवनाथ सोबत आलेले रामा नागरे याने त्याचे हातातील लोखंडी गज फिर्यादीचे डोक्यात मारुन दुखापत केली. त्यामुळे फिर्यादीचे डोक्यातून रक्त येत असल्याने फिर्यादीच्या मुलाने सोडविण्याचा प्रयत्न करत असताना त्यास पण लाथा - बुक्यांनी मारहाण करुन आरोपी राहुल नागरे याने तेथे येवुन फिर्यादीच्या पाठीत दगड मारुन दुखापत केली. आरोपी नवनाथ याने पुन्हा हातातील काहीतरी लोखंडी वस्तुने फिर्यादीचे डोक्यात मारुन दुखापत केली व फिर्यादी खाली पडले. त्यामुळे फिर्यादीच्या मुलीने त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला असता आरोपी नवनाथ नागरे याने फिर्यादीची मुलगी अल्पवयीन आहे असे माहीत असतांना देखील तीस ओढून गाडीवर बळजबरीने बसवुन तिचेशी लग्न करणेच्या उद्देशाने पळवुन नेले आहे. त्यांचे फिर्यादीवरून
लासलगाव पोलीस ठाणे गु.र.नं.२५/२०२५ भा.न्या.संहिता १३७(२), ९६,११८(१), ११५(२)३५२,३५१(२)(३),३(५), लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ८.१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक पवन सुपनर अधिक तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका कुणी करु...
संविधान घ्या - संविधान द्या उपक्रम हळदी कुंकू समारंभात संविधानाचा जागर..!
शांत झोपेची कला आत्मसात करा..!
नागपूरचा निलेश जोगी ठरला आमदार श्रीचा मानकरी, मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव ठरला स्पर्धेतील आकर्षण
हवामानात होत असलेले बदल गांभीर्याने घेण्याची गरज   आंतरराष्ट्रीय परिषदेतील तिसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रातील सूर 
आई ही शिक्षण, मूल्य आणि शिस्त यांची पहिली शाळा :आ.किशोर जोरगेवार
पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या 10 संकल्पासह आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप