हवामानात होत असलेले बदल गांभीर्याने घेण्याची गरज   आंतरराष्ट्रीय परिषदेतील तिसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रातील सूर 

एस एन डी टी महिला विद्यापीठाचे आयोजन 

हवामानात होत असलेले बदल गांभीर्याने घेण्याची गरज   आंतरराष्ट्रीय परिषदेतील तिसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रातील सूर 

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेले हवामानातील बदल हे अतिशय गांभीर्याने घेण्याची वेळ आलेली असून यावर वेळीच उपाययोजना न केल्यास येणाऱ्या काळात गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता वर्तवत हे सगळे बदल गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मनोगत एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये वक्त्यांनी व्यक्त केली.

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई द्वारे स्थानिक वन अकादमी, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वातावरण बदलातील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आयोजित चर्चासत्रामध्ये एस.पी.पी.यू. पुणे येथील हवामान शास्त्रज्ञ, भूगोल विभाग प्रमुख अमित धोरडे, वरिष्ठ प्राध्यापक सुधाकर परदेशी व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथील आयआयटीयन डॉक्टर सबीन आदी सहभागी झाले होते. या सत्रामध्ये अमित धोरडे यांनी भारतातील वेगवेगळ्या राज्यात बदलत चाललेले तापमान आणि या तापमानाचा एकूणच संपूर्ण मानव जातीवर, प्राणी जातीवर आणि पर्यावरण वर होत असलेला परिणाम यावर विस्तृत स्वरूपात विषयाची मांडणी केली.
भूगोल विभागाचे प्राध्यापक सुधाकर परदेशी यांनी बदलत्या हवामानात लवचिक आणि शाश्वत पाण्याच्या उपलब्धतेतील आव्हाने आणि गतिमान जलसंपत्तीची परिस्थिती या विषयावर आपले मनोगत व्यक्त करत असताना आज देशामध्ये उपलब्ध असलेले पाणी, या पाण्याला साठवण्याची गरज, त्याचा योग्य उपयोग आणि साठवलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी काय काय उपाययोजना करावी लागतील या संदर्भात आपले अभ्यासपूर्ण मत या परिषदेमध्ये मांडले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे चे डॉक्टर सबिन यांनी हवामान बदल समजून घेणे त्यामागील विज्ञान आणि मॉडेलिंग हा विषय उपस्थितांना एकूणच जगामध्ये होत असलेले बदल, वातावरणातील बदल, याबद्दलचा मानव जातीसह वन्य प्राण्यांवर होणारा परिणाम आणि यामुळे एकूणच बदलत चाललेली समाज व्यवस्था, पर्यावरणीय व्यवस्था आणि येणाऱ्या काळातील आव्हाने या सर्व विषयावर आपले अभ्यासपूर्ण असे संशोधनपर मत मांडत असतानाच ही आंतरराष्ट्रीय परिषद वातावरण बदलतील चर्चांना योग्य दिशा देईल व येणाऱ्या काळात धोरण ठरविण्यात ही परिषद एक मैलाचा दगड ठरेल असेही सूर या चर्चासत्रामध्ये उमटले. 

मँग्रोव्ह्ज वाचविणे काळाची गरज

तीन दिवसीय परिषदेमध्ये आयोजित पॅनल चर्चेमध्ये मँग्रोव्ह्ज जंगलाचे महत्व, महाराष्ट्रातील प्रमाण, हे जंगल वाचविण्यासाठी चाललेले प्रयत्न, त्याच्या सुरक्षेते करता तयार करण्यात आलेल मोबाईल ॲप्लिकेशन या संपूर्ण बाबींची माहिती पॅनल चर्चेच्या दरम्यान करण्यात आली. व्यवस्थापक डॉक्टर किरण माळी आणि असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश राणे यांनी मँग्रोव्ह्ज फाउंडेशन या फाउंडेशनची संपूर्ण सविस्तर माहिती देत असताना मँग्रोव्ह्ज जंगल याची आजच्या काळातील गरज विशद केली. शिवाय या मँग्रोव्ह्ज जंगलाचे महाराष्ट्रातील एकूण प्रमाण, हे मँग्रोव्ह्ज जंगल वाचविण्यासाठी संपूर्ण देशभर चालत असलेले प्रयत्न ,त्याच्या सुरक्षे करता तयार करण्यात आलेले मोबाईल ॲप्लिकेशन आणि मंगरूळ फाउंडेशनने तयार केलेल्या इको टुरिझम या संदर्भात संपूर्ण सविस्तर अशी माहिती देण्यात आली. शिवाय मरीन कंजर्वेशन या विषयावर जलचर प्राण्यांबद्दलची सविस्तर माहिती देत असतानाच टर्टल ट्रीटमेंट सेंटर याद्वारे जलचर प्राण्यांची निगा कशी राखायची, या जलचर प्राण्यांचे महत्त्व आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये या जलचर प्राण्यांवर करण्यात येणारी ट्रीटमेंट या संपूर्ण विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन च् माध्यमातून आपल्या विषयाचा सादरीकरण केलं या सादरीकरणाला देशासह जगातील आलेल्या विविध संशोधक अभ्यासक विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नावलीच्या माध्यमातून उत्तम प्रतिसाद देत या विषयाची या आंतरराष्ट्रीय परिषदेतील महत्त्व विशद केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका कुणी करु...
संविधान घ्या - संविधान द्या उपक्रम हळदी कुंकू समारंभात संविधानाचा जागर..!
शांत झोपेची कला आत्मसात करा..!
नागपूरचा निलेश जोगी ठरला आमदार श्रीचा मानकरी, मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव ठरला स्पर्धेतील आकर्षण
हवामानात होत असलेले बदल गांभीर्याने घेण्याची गरज   आंतरराष्ट्रीय परिषदेतील तिसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रातील सूर 
आई ही शिक्षण, मूल्य आणि शिस्त यांची पहिली शाळा :आ.किशोर जोरगेवार
पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या 10 संकल्पासह आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप