सततची नापिकी व कर्जाला कंटाळून शेळगाव गौरी येथील शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या
आधुनिक केसरी न्यूज
तानाजी शेळगांवकर
नायगाव : कधी कमी तर कधी अति पाऊस होऊन सततची शेतकऱ्याची शेतातील पिकांची होणारी नापीकी यामुळे डोक्यावर वाढणाऱ्या कर्जाला कंटाळून नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी येथील सतबा पिराजी वाघमारे वय 55 वर्षे या शेतकऱ्यांनी दिनांक 9 जानेवारी रोजी पहाटे विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे वाघमारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेळगाव गौरी तालुका नायगाव येथील अतिशय कष्टाळू असलेले सतबा पिराजी वाघमारे यांना दोन पत्नी व एकच मुलगी असा त्यांचा परिवार असताना ते आपल्या परिवाराचा गाडा शेतीवर सांभाळत होते. एकुलती एकच मुलगी असल्याने तिला शिक्षणासाठी शाळेत पाठवले जात होते ती इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना सतबा व त्यांच्या दोन्ही पत्नी शेतात कष्ट करायचे परंतु शेतात वर्षभर कष्ट करूनही घातलेले पैसेही निघत नसल्याने सततच्या या नापिकीमुळे वरच्यावर कर्ज वाढत जात होते यामुळे तो नेहमी बेचैन असायचा.
सततची नापिकी व वाढत असलेल्या कर्जाला कंटाळून सतबा वाघमारे यांनी दि.9 जानेवारी रोजी पहाटे विष प्राशन करून आत्महत्या केल्याने त्यांच्यावर शेळगाव गौरी येथे सायंकाळी चारच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात दोन पत्नी आणि एक मुलगी असुन वाघमारे यांच्या अकाली दुःखद निधनामुळे वाघमारे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Comment List