आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला घुग्घूस वासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सैराट फेम रिंकू राजगुरू (आर्ची) ठरली आकर्षण, ५० नृत्य समूहांचा सहभाग

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला घुग्घूस वासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शनिवारी घुग्घूस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात "उत्सव नारिशक्तीचा" या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. घुग्घूस वासियांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एकल नृत्य, युगल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धेत ५० हून अधिक गटांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सैराट फेम रिंकू राजगुरू हिच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण अधिक रंगतदार झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, विवेक बोडे, नितू चौधरी, सुचिता लुटे, शारदा दुर्गम, वैशाली ढवस, सुषमा सावे, कुसुम सातपुते, नंदा कांबळे, उषा आगदारी, नितू जयस्वाल, उज्वला उईके, वनिता निहाल, किरण बोंढे, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, संजय तिवारी, राजकुमार गोडशेलवाल, साजन गोहणे, सीनू इसारप, इमरान खान, स्वप्निल वाढई, मुन्ना लोढे, सुरज मोरपाका, अनिल बाम, राजेश मोरपाका, मयूर कलवल, सुनिता घिवे, जयश्री राजूरकर सिनल भरडकर आदी मान्यवर उपस्थित होते.  

कार्यक्रमाला संबोधित करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, "महिला सबलीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. आजच्या या कार्यक्रमातून घुग्घूस शहरातील महिला कलावंतांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले आहे. महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शिक्षण, कला आणि सामाजिक कार्य यामध्ये पुढाकार घ्यावा. अशा प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतात. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवून महिलांना संधी उपलब्ध करून दिली जाईल असे ते यावेळी म्हणाले.समोर सैराट फेम रिंगू राजगुरू (आर्ची) या उत्तम अभिनेत्री आज उपस्थित आहेत. तिच्या संघर्षमय प्रवासातून आणि अभिनय कारकिर्दीतून तरुणींना प्रेरणा मिळेल. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, कला, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात पुढे जावे, हीच या कार्यक्रमामागची संकल्पना आहे.

या भागातील विकासकामांबरोबरच महिला शक्तीला प्रोत्साहित करणारे कार्यक्रम पूढेही आयोजित करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. घूग्घूस वासीयांचा मिळालेला प्रतिसाद आजिवन स्मरणात राहिल. आमदार किशोर जोरगेवार यांनी अशा आयोजनातून महिलांना संधी उपलब्ध करुन दिली आहे. आपल्या शहरात आल्यावर उर्जावान घूग्घूसवासी पाहून आनंद झाला. आयोजन उत्तम असून आपल्या उपस्थितीने त्याची भव्यता आणखी वाढल्याचे यावेळी रिंगु राजपूत यांनी सांगीतले. यात एकल स्पर्धेत प्रिती झाडे, युगल नृत्य स्पर्धेत शोभा आणि विभा, तर सामुहिक नृत्य स्पर्धेत शेणगाव येथील नचले गृपने प्रथम पारितोषिक पटकावले. कार्यक्रम पाहण्यासाठी घुग्घूस वासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

डॉ.खत्री महाविद्यालयात क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न डॉ.खत्री महाविद्यालयात क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : (का.प्र.) स्थानिक डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर येथे २६ व २७ जानेवारी २०२५ या दोन...
आर्थिकदृष्ट्या सक्षम करून मच्छिमारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणार मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला घुग्घूस वासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
जनता जनार्धनाचा अर्थसंकल्प : पालकमंत्री डॉ अशोक उईके
जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधीकरीता प्रयत्न करणार
भारतीय अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी ठोस निर्णयांचा अर्थसंकल्प :आ.किशोर जोरगेवार