जनता जनार्धनाचा अर्थसंकल्प : पालकमंत्री डॉ अशोक उईके
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : देशाला विश्वगुरू करण्याचा संकल्प करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प जनता जनार्धनाला समर्पित आहे.या अर्थसंकल्पात विरोधकांना टीका करायला कुठलीच संधी दिलेली नाही. शेतकरी, युवा, महिलासाठी विशेष योजना, बी-बियाणे स्वस्त तर खत कारखाने निर्मितीचे आश्वासन दिलासादायक असून काही औषधे स्वस्त करण्याचा निर्णय स्वागताचा आहे.आदिवासी कुटुंबाच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे नियोजन आहे. ग्रामीण भागात रोजगार, प्रामुख्याने 5 लाख मागास महिलांना फायदा देण्यात येणार आहे. कापूस उत्पादकांसाठी 5 वर्षाचे नियोजन केले आहे. हा करमुक्त अर्थसंकल्प असून शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ होणार आहे. शेतकरी, महिला, तरुणासाठी अनेक घोषणा केल्या असल्याने चौफेर ऊर्जा देणारा अर्थसंकल्प असेच म्हणावे लागेल.
Comment List