राधिका दोरखंडे ठरली गोंडवाना विद्यापीठाची उत्कृष्ट विद्यार्थिनी..!
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजूरा येथील २०२३-२४ मधे बी. एस्सी. तृतीय वर्षात असणारी राधिका लीलाधर दोरखंडे हिला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चा उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार २०२४ प्राप्त झाला असून, या पुरस्काराबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पुरस्कारासाठी संपूर्ण विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयातून पुरस्कार मागविण्यात आले होते, त्याची छाननी समितीद्वारे छाननी करून पुरस्कार जाहीर करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांच्या मागील ३ वर्षातील लेखाजोगा तपासण्यात येऊन विविध क्षेत्रातील राष्ट्रीय, राज्य आणि विद्यापीठ स्तरीय कार्य आणि सहभाग या सर्व बाबी तपासण्यात येऊन निवड यादी जाहीर करण्यात आली.
हा पुरस्कार गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात २ ऑक्टोबर २०२४ ला प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार राधिकाला मिळाल्याबद्दल संस्थेचे संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या तर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comment List