मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर...
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर/यवतमाळ : राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातील मायक्रो ओबीसींमधील कलार, सोनार, सुतार, लोहार, गुजर व अन्य समाज बांधवांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व अन्य प्रश्न, समस्या जाणून घेत त्या समस्यांच्या निराकरणाकरिता नियोजनात्मक उपाययोजना व योग्य कार्यवाही करण्याच्या उद्देशाने मुंबई येथे मान. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपा प्रदेश पदाधिकारी विजय चौधरी, संजय गाते, माजी आमदार अॅड संजय धोटे, सर्जेराव कळसकर, हितेश मेश्राम, मधुकर शेंडे, वसंत सुतार आदी प्रभुती व वरील समाजाचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रधानमंत्री मोदीजींनी ओबीसींच्या उत्थानाकरिता
भरीव कार्य केले- भुपेंद्र यादव : या बैठकीस मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने कायम ओबीसी समाजाच्या उत्थानाकरिता अनेक महत्वाकांक्षी योजना राबवून ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रात प्रगतीचे मार्ग प्रशस्त केल्याचे सांगितले. केंद्रीय सत्तेमध्ये अनेक महत्वाच्या खात्यावर ओबीसी मंत्र्याची नेमणूक करून सरकारमध्ये ओबीसींना सन्मानजनक वाटा देण्याचे कार्य माननिय प्रधानमंत्र्यानी केले असल्याचेही भुपेंद्र यादव म्हणाले.
ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांनी माननिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील ओबीसींच्या कल्याणाकरिता ओबीसी आयोगास संवैधानिक दर्जा बहाल करून त्यांच्या न्याय हक्कांचे संरक्षण करीत त्यांना मुबलक सोई-सुविधा देण्याचे कार्य केले आहे. राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून व ओबीसी मंत्रालयाद्वारे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय व योजना राबवून ओबीसींना राष्ट्रीय प्रवाहाशी जोडण्याचे यशस्वी कार्य केले आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग सर्व ओबीसी बांधवाच्या घटनात्मक अधिकारांप्रती जागरूक असून आरक्षणातील घोटाळे व ओबीसींना शिक्षण, शिष्यवृत्ती, उच्च शिक्षण, नोकरी व अन्य क्षेत्रात रोष्टर नुसार मिळणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी सजगपणे कार्य करीत असल्याचे सांगितले.या बैठकीस मायको ओबीसी घटकांचे प्रतिनिधी व समाजातील प्रमुख समाजबांधव उपस्थित होते.
Comment List