पेट्रोल डिझेल होणार स्वस्त; तब्बल एवढ्या रुपयांनी होणार कपात आजचे दर जाणून घ्या...

पेट्रोल डिझेल होणार स्वस्त; तब्बल एवढ्या रुपयांनी होणार कपात आजचे दर जाणून घ्या...

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच इंधनदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. लिटरमागे किमान 2 रुपयांची कपात होणार, अशी चर्चा आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती कमी जास्त होत असल्याचं चित्र आहे. मात्र, भारतात अजूनही पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात प्रति पिंप 70 डॉलरच्या खाली घसरले आहे. डिसेंबर 2021 नंतर पहिल्यांदाच तेलाच्या दरात इतकी घसरण झाली.

लोकसभा निवडणुकीदरम्यान इंधनदरात काही अंशी कपात झाली होती. या व्यतिरिक्त गेल्या दोन वर्षापासून इंधानाच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इंधनदरात कपात होईल की नाही?, असे प्रश्न केले जात आहेत. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. या निवडणुकीपुर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची घसरण होणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना निवडणुकीपूर्वीच खुशखबर मिळू शकते.

भारत हा जगातील सर्वांत मोठा तिसरा तेल आयात करणारा देश आहे. ही गरज भागवण्यासाठी भारताला 87 टक्के विदेशी स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागते. अशा स्थितीत भारत आता कच्च्या तेलाची जास्तीत जास्त खरेदी करण्यास तयार आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.दरम्यान, महाराष्ट्रात आज 20 सप्टेंबररोजी पेट्रोलची सरासरी किंमत 104.87 रुपये प्रति लिटर आहे. तर, डिझेलची सरासरी किंमत 91.31 रुपये प्रतिलिटर आहे. आता  सर्वसामान्यांना इंधनदरात दिलासा मिळणार का, हे आगामी काळात दिसून येईलच.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर... मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर...
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर/यवतमाळ : राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातील मायक्रो ओबीसींमधील कलार, सोनार, सुतार, लोहार, गुजर व अन्य समाज...
आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास...
चंद्रपूरच्या शिक्षण विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड दोन विस्तार अधिकारीसह एक लिपिक अडकले...
विभागीय अधिकारी लाच घेतांना एसीबीच्या ताब्यात...
तुरी' च्या तुर्हाट्या अन 'कापसा'च्या झाल्या वाती ! 
नरेंद्र मोदी एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला आज सहाव्यांदा येणार होते !
साईबाबांना १८ लाखाचा मुकुट साईभक्ताने केला दान