साईबाबांना १८ लाखाचा मुकुट साईभक्ताने केला दान

साईबाबांना १८ लाखाचा मुकुट साईभक्ताने केला दान

आधुनिक केसरी न्यूज 

       शिर्डी : साईभक्त भाविकांच्या मनोकामना पुर्ण करत असलेल्या श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची  मोठी श्रद्धा आहे देशविदेशातील . भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात.  २६ सप्‍टेंबर २०२४ रोजी  तेलंगाणा राज्यातील  नलगोंडा येथील श्रीमती सी. एच. भाग्‍यलक्ष्‍मी या साईभक्ताने साईचरणी २५८ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण करून साईचे मनोभावे दर्शन घेतले 
अधिक माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. या मुकूटाची किंमत १७ लाख ७३ हजार ७५० रुपये असून हा सुंदर नक्षिकाम असलेला सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द करण्‍यात आला. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्‍तांचा शाल व श्री साईबाबांची मुर्ती देवून सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर... मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर...
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर/यवतमाळ : राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातील मायक्रो ओबीसींमधील कलार, सोनार, सुतार, लोहार, गुजर व अन्य समाज...
आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास...
चंद्रपूरच्या शिक्षण विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड दोन विस्तार अधिकारीसह एक लिपिक अडकले...
विभागीय अधिकारी लाच घेतांना एसीबीच्या ताब्यात...
तुरी' च्या तुर्हाट्या अन 'कापसा'च्या झाल्या वाती ! 
नरेंद्र मोदी एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला आज सहाव्यांदा येणार होते !
साईबाबांना १८ लाखाचा मुकुट साईभक्ताने केला दान